Maharashtra Political News : भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश होताच कडाडून विरोध; थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश करत काही तास उलटताच भाजपने विरोध दर्शवला आहे.
Bhusai Desai
Bhusai Desai Saam tv

संजय गडदे

मुंबई : ठाकरे गटाचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश करत काही तास उलटताच भाजपने विरोध दर्शवला आहे. भूषण देसाई यांच्या शिवसेना प्रवेशाला गोरेगाव भाजपने विरोध दर्शवला आहे. गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)

ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब भवनमध्ये हा पक्षप्रवेश झाला. भूषण देसाईंचा शिवसेनेत (Shivsena) प्रवेश होऊन काही तास उलटताच गोरेगाव भाजपने विरोध दर्शवला आहे.

Bhusai Desai
Subhash Desai: मुलाचं शिंदे गटात प्रवेश करणं क्लेशदायक, सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया

गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना यबद्दल पत्र लिहिलं आहे. भ्रष्ट व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षांमध्ये प्रवेश न देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

भूषण सुभाष देसाई हे फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आल्याचा संदीप जाधव यांचा पत्रातून आरोप करण्यात आला आहे. भ्रष्ट आणि मलिन चरित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना असल्याचे पत्रात म्हटले आहे. आपली युती आहे. मित्राची एक चूक दोन्ही पक्षांना भारी पडू शकते, असे पत्रात नमूद आहे.

गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांचे पत्र जसेच्या तसे

प्रति

श्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

विषय : भ्रष्ट व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षांमध्ये प्रवेश न देण्याबाबत

माननीय मुख्यमंत्री साहेब,

मी भाजपा गोरेगावचा मी विधानसभा उपाध्यक्ष, एक छोटा कार्यकर्ता आहे. आपणास कोणती गोष्ट सुचवावी एवढी माझी राजकीय उंची नाही पण नाईलाजास्तव हे पत्र लिहित आहे. आत्ताच भूषण सुभाष देसाई यांच्या प्रवेशाची बातमी टीव्ही चॅनल वर बघितली. आम्ही गोरेगावकर या भ्रष्ट व्यक्तिमत्वाला चांगलेच ओळखून आहोत तसेच आम्ही प्रथम शिवसेनेत होतो, गेले चार वर्षे भाजपात आहोत.

भूषण सुभाष देसाई हा फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आलेले आहेत. आपल्या पक्षाचे तसेच आपली प्रतिमा ही खूप चांगली आहे पण अशा भ्रष्ट आणि मलीन चरित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना जागल्या आहेत.

आज आपण युतीमध्ये आहोत मित्र पक्षाची एक चूक सुद्धा दोन्ही पक्षास महाग पडू शकते. मी एक छोटा कार्यकर्ता आहे पण आपण या सूचने चा नक्कीच विचार कराल अशी अपेक्षा...

धन्यवाद ! आपला नम्र

संदिप जाधव

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com