भीमाशंकर परिसरातील कळमोडी धरण ओव्हरफ्लो...!

प्रशासनाकडुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भीमाशंकर परिसरातील कळमोडी धरण ओव्हरफ्लो...!
भीमाशंकर परिसरातील कळमोडी धरण ओव्हरफ्लो...!रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे - सह्याद्रीच्या कुशीत गेल्या दोन दिवसांपासुन पावसाची Rain संततधार सुरु असल्याने आरळा नदीवर River असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन धरणातुन आरळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

भीमाशंकर Bhimashankar परिसरात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे १.५ टी.एम.सी असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन आरळा नदीतुन चास-कमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. प्रशासनाकडुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे देखील पहा -

काळमोडी धरण आठही सांडव्याद्वारे रात्रीच्या सुमारास ६९७९ क्यूसेक वेगाने पाणी स्वयंचलित दरवाजाद्वारे आरळा नदीत सोडण्यात आले. पहाटे पावसाचा थोडा जोर कमी झाल्याने ३००० क्युसेक वेगाने पाणी सुरू आहे. कळमोडी धरण परिसरात पडत असणाऱ्या पावसाने मागील २४ तासांत ९४ मिलिमिटर नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे.

भीमाशंकर परिसरातील कळमोडी धरण ओव्हरफ्लो...!
राज्यात सर्वत्र पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. चासकमान धरण परिसरात मागील २४ तासांत ६८ मिलिमिटर नोंद करण्यात आली आहे.तसेच भिमाशंकर परिसरात ३१३ मि.मी पाऊस झाला आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत ३.०८ मि.मी वाढ झाली आहे.पाणीसाठ्यात १ टी.एम.सी.वाढ झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत पाऊस अद्यापही सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com