भीमा साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू : रमेश थोरात

भीमा पाटस कारखान्याची पुणे जिल्हा बँकेकडील १५० कोटी रूपयांची थकबाकी मागील २ वर्षापासून थकलेली असल्याने बँकेने कारखाना जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
भीमा साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू : रमेश थोरात
भीमा साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू : रमेश थोरातSaam Tv
Published On

केडगाव : भीमा Bhima पाटस Patas कारखान्याची पुणे Pune जिल्हा बँकेकडील १५० कोटी रूपयांची थकबाकी Arrears मागील २ वर्षापासून थकलेली असल्याने बँकेने Bank कारखाना जप्तीची कारवाई सुरू केली आहे. अशी माहिती बँकेचे अध्यक्ष तथा दौंडचे माजी आमदार MLA रमेश थोरात Ramesh Thorat यांनी सांगितले आहे.

थोरात म्हणाले, बँकेने कारखान्याला भांडवली कर्ज आणि मध्यम मुदत कर्ज दिलेले आहे. मागील २ वर्षापासून कारखाना थकबाकीत गेले आहे. अनेक प्रयत्न करून देखील कर्जाची वसुली होत नाही. यामुळे बँकेच्या नियमानुसार आम्ही थकबाकीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. थकबाकीबाबत आम्ही आजिबात वसुलीमध्ये सवलत देत नाही.

हे देखील पहा-

राज्यात महायुतीचे सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद पडललेल्या भीमा पाटस कारखान्याला ३६ कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आले होते. त्या वर्षी कसे तरी कारखाना चालू झाला. कारखाना सुरू रहावा याकरिता हे कर्ज दिले होते. मात्र, कारखाना पुन्हा बंद पडला आहे. याचे सर्वांनाच मोठे आश्चर्य आहे. भीमा पाटसमुळे बँकेच्या एनपीएमध्ये वाढ झालेली आहे.

कारवाई विषयी थोरात म्हणाले, सुरक्षा कायद्यानुसार आम्हाला कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. कारखाना थकबाकीत गेलेला असताना कारवाई का केली नाही, असा मुद्दा लेखा परिक्षणातही निघू शकणार आहे. आमच्या अंगलट काही येऊ नये, याकरिता सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. कामकाजात कोणतेही बेशीस्तपणा चालणार नाही, म्हणून पुणे जिल्हा बँक देशामध्ये टॅापला आहे.

भीमा साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई सुरू : रमेश थोरात
'कारखान्यांची मालमत्ता, साखर ताब्यात घ्या'; पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्या!

याबाबत भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार राहुल कुल म्हणाले की, कायद्याच्या, नियमांचा चौकटीत राहून आम्ही पुणे जिल्हा बँकेला काही प्रस्ताव देण्यात आले होते. ते बँकेने मान्य केले, तर कारखाना सुरू करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश येऊ शकते. बँकेच्या कायदेशीर कारवाईला आमचा विरोध आजिबात असणार नाही. मात्र, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी कारखान्याची जप्ती करण्यापेक्षा आमचे प्रस्ताव स्वीकारून कारखाना सुरू करण्यात पुढाकार घ्यावा. थोरात यांनी प्रस्ताव स्वीकारून सहकार्य करावे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com