Chandrashekhar Azad: 'भाजपला रोखले नाही तर...'; चंद्रशेखर आझाद यांची टीका

Chandrashekhar Azad Latest News: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'भाजपला रोखले नाही तर भारताचे संविधान संपून जाईल, असा घणाघात चंद्रशेखर आझाद यांनी केला.
Chandrasekhar Azad
Chandrasekhar AzadSaam tv
Published On

Chandrashekhar Azad On BJP:

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'भाजपला रोखले नाही तर भारताचे संविधान संपवेल, अशी टीका चंद्रशेखर आझाद यांनी केली. संविधान वाचविण्यासाठी बाबासाहेब यांच्या विचाराच्या लोकांनी एकत्र यावे हवं, असं भावनिक आवाहन चंद्रशेखर आझाद यांनी केलं. (Latest Marathi News)

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान चंद्रशेखर आझाद यांनी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला भेट दिली. या भेटीनंतर चंद्रशेखर आझाद यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आझाद यांनी भाजपवर कडाकडून निशाणा साधला.

Chandrasekhar Azad
Sangli News: शिवसेना कार्यालयावरून शिंदे-ठाकरे गटाचे शिवसैनिक आमनेसामने; कार्यकर्त्यांची एकमेकांना धक्काबुक्की

चंद्रशेखर आझाद यांची भाजपवर टीका

चंद्रशेखर आझाद म्हणाले, 'आता सर्वांनी एकजूट करून भाजपची सत्ता उलथून टाकली पाहिजे. आजपासून विरोधी पक्षांनी कोरेगाव भीमाच्या भूमीतून भाजपला पराभूत करण्याचा विडा उचलायला हवा. भाजपने विरोधी पक्षांची तोडफोड करून लोकशाहीची हत्या करून महाराष्ट्रात सत्ता आणली आहे. मात्र यामुळे जनता भाजपसोबत नाही'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप देशातील पैसा लुटून पळून जातेय: चंद्रशेखर आझाद

'एकीकडे महागाई बेरोजगारी ,शेतकऱ्यांचे प्रश्न ,महिला अत्याचार ,युवकांना रोजगार यावर विचार करण्याची वेळ आली आहे. भाजप देशातील पैसा लुटून पळून जात आहे. यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे. गुलामीतून मुक्ती मिळविण्यासाठी आमच्या पूर्वजांनी लढाई केली होती. त्यासाठी आम्ही शौर्य दिन साजरा करतो, मात्र ज्या प्रकारे आरएसएस आणि भाजप देशाला गुलाम बनवायला लागले आहेत, असेही ते म्हणाले.

Chandrasekhar Azad
New Hit-and-Run Law:ट्रक चालकांनी का पुकारलं आंदोलन; सरकारच्या कोणत्या कायद्याचा होतोय विरोध

बाबासाहेबांना मानणारे लोक गप्प का ? आझाद यांचा सवाल

'संसदेतील १४० पेक्षा जास्त खासदार यांनी निलंबित केले आहेत. आपल्या मनाप्रमाणे कायदे बनविले जातात ही लोकशाहीची हत्या आहे. बाबासाहेबांना मानणारे लोक गप्प का आहे, असा प्रश्न आझाद यांनी केला आहे. ज्या प्रकारे सुभाष चंद्र बोस यांनी नारा दिला होता, 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे अझादी दुंगा' अशी वेळ आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com