Bhandup News: धक्कादायक! भांडुपमध्ये टॉर्च लावून गर्भवतीची प्रसूती, आईसह बाळाचा मृत्यू

Bhandup Sushma Swaraj Hospital: भांडुपच्या सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये प्रसुतीसाठी एका महिलेला दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसुती करत असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे डॉक्टरांनी चक्क लाईट लावून महिलेची प्रसूती केली.
Bhandup Sushma Swaraj Hospital
Bhandup Sushma Swaraj HospitalSaam Tv

मयुर राणे, मुंबई

आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी अत्यंत भयंकर घटना मुंबईच्या भांडुपमधील पालिकेच्या रुग्णालयात घडली आहे. भांडुपच्या सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये टॉर्चच्या उजेडामध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली. गर्भवती महिलेची प्रसूती करत असताना नवजात शिशूचा मृत्यू झाला. त्यानंतर बाळाच्या आईची देखील प्रकृती गंभीर झाली. या महिलेचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपच्या सुषमा सुराज पालिका प्रसूतीगृहामध्ये प्रसुतीसाठी एका महिलेला दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसूती करत असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे डॉक्टरांनी चक्क लाईट लावून महिलेची प्रसूती केली. सिझर करत असताना नवजात शिशूचा मृत्यू झाला. त्यानंतर जास्त रस्तस्राव होऊ लागल्यामुळे महिलेची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे तिला देखील सायन रुग्णालयात हलवण्यात आले.

Bhandup Sushma Swaraj Hospital
Yamini Jadhav: दक्षिण मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार ठरला! अरविंद सावंतांच्या विरोधात यामिनी जाधव यांना दिलं तिकीट

सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना या महिलेचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे महिलेच्या कुटुंबियांनी संपात व्यक्त करत रुग्णालयामध्ये गोंधळ घालत डॉक्टरांना जाब विचारला. तर डॉक्टरांनी उडवा उडवीची उत्तरं दिली असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Bhandup Sushma Swaraj Hospital
Pune News: सहलीला जाणं पडलं महागात, चोरट्यांनी ४४ लाखांवर मारला डल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com