गृहिणी होणं कोल्हापूरहून पुण्यात येण्याइतकं सोपं नसतं; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

काल भाजपने ओबीसी राजकीय आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला होता.
Rohit Pawar, Chandrakant Patil
Rohit Pawar, Chandrakant PatilSaam Tv

मुंबई: भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. काल ओबीसी राजकीय आरक्षणासाठी मंत्रालयावर भाजपने मोर्चा काढला. या मोर्चा दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका करताना, स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला होता. तसंच दिल्लीत जा नाहीतर मसणात जा असं वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केलं होत. आता यावरुन चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टीका केली आहे. (Rohit Pawar Latest News)

Rohit Pawar, Chandrakant Patil
आनंदाची बातमी! मान्सूनची आगेकूच,महाराष्ट्रात कधी?

भाजपच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीतील नेत्यांनी पाटील यांच्यावर टीका केली आहे. आज रोहित पवार यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडले आहे. 'गृहिणींचा अभिमान असावा, पण भाजप नेत्यांकडून महिलांचा नेहमीच द्वेष केला जातो आणि चंद्रकांत दादांचं वक्तव्यही याच द्वेषातून आलेलं आहे.. म्हणूनच राजकारणी व यशस्वी गृहिणी असलेल्या सुप्रियाताईंबद्दल त्यांचा राग असावा! पण गृहिणी होणं हे कोल्हापूर सोडून पुण्याला येण्याइतकं सोपं नसतं!' असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

Rohit Pawar, Chandrakant Patil
राज्यात पाणी टंचाई; धरणांमध्ये केवळ ३७ टक्के जलसाठा शिल्लक

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादीने केला आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी विधान केले होते. या विधानावरून आरोप प्रत्यारोप सुरु होते. “ओबीसी आरक्षणासंदर्भात आपण एकत्र लढायचे असे ठरले होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले. दोन दिवसांत असं काय त्या सरकारने केले आणि दिल्लीत बैठक झाली आणि त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारला विचारणार आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांनी त्यांना स्वयंपाक करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होत.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com