राजगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, बचाव करताना महिला दरीत कोसळली

किल्ले राजगड (Rajgad Fort) फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी (Bee Attack) अचानक हल्ला चढवला.
Rajgad Fort
Rajgad FortSaam Tv
Published On

जुन्नर : किल्ले राजगड (Rajgad Fort) फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी (Bee Attack) अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात तीन पर्यटक जखमी झाले आहेत. यातील एक महिला मधमाशांपासून बचाव करत असताना दीडशे फूट दरीत कोसळली. शनिवारी (२३ एप्रिल) सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय मधुकर पवार, रोहिणी सागर वराट (वय २८) आणि सागर दिनेश वराट (तिघेही राहणार भुमकर चौक पुणे ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना नसरापुर (ता. भोर) येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Bees Attack of Three Tourists On Rajgad Fort)

Rajgad Fort
Navneet Rana: आवाज खाली करा...; घरी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर नवनीत राणा भडकल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही पर्यटक (Tourist) एकाच कुटुंबातील असून ते आज सकाळी राजगड बघण्यासाठी आले होते. त्याचवेळी ते राजगडच्या गुंजवणे दरवाजा जवळ आले उभे असता, त्यांच्यावर अचानक आगी मोहळाच्या मधमाशांनी हल्ला चढवला. त्यांच्यासोबत किल्ल्यावरील अनेक पर्यटकांनाही या मधमाशांनी चावा घेण्यास सुरूवात केली.

यावेळी रोहिणी चराट ही महिला मधमाशांपासून बचाव करत असताना जवळपास दीडशे फूट खोल असलेल्या दरीत पडली. तेव्हा किल्ल्यावर उपस्थित असलेले किल्लेदार बापू साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दरीमध्ये पडलेल्या रोहिणी चराट यांना बाहेर काढले. मात्र खोल दरीत पडल्याने सदरील रोहणी चराट या बेशुद्ध झाल्या होत्या.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने राजगडावर धाव घेतली. पोलीस नाईक ज्ञानेश्वर धिवार, पोलीस कॉंस्टेबल औदुंबर अडवाल, पोलीस कॉन्स्टेबल वैजनाथ घुमरे, ज्ञानेश्वर शेडगे आदी कर्मचाऱ्यांनी जखमी (Injured) झालेल्या महिलेला झोळी करून किल्ल्याच्या खाली आणले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच नसरापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

राजगडावर अपघातांच्या अनेक घटना

किल्ले राजगड तसेच तोरणा गडाला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. यामध्ये अनेकदा अनेक अपघाताच्या विविध घटना घडत आहेत. खोल दरीत पडणे, सर्पदंश होणे, हृदयविकाराचा झटका आल्याने दरीत कोसळने अशा अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. त्यामुळे वेल्हे तालुक्यातील दोन गडावर रेस्क्यू टीमचे साहित्य मिळावे अशी मागणी गडप्रेमींकडून केली जात आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com