BMC Election 2022: "....आणि फक्त एकदा नगरसेवक होऊन दाखवा" - मोहित कंबोज यांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

BMC Election 2022: माझं राऊतांना खुलं आव्हान आहे की, गोवा आणि युपीचं राहु द्या. मुंबई महापालिकेतला सर्वात ताकदीचा सेफ वॅार्ड निवडा आणि फक्त एकदा नगरसेवक होऊन दाखवा.
BMC Election 2022: Mohit Kamboj's open challenge to Sanjay Raut
BMC Election 2022: Mohit Kamboj's open challenge to Sanjay RautSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) स्थापनेत महत्वाची भुमिका निभावणारे शिवसेनेतले बडे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना "एकदा नगरसेवक (Corporator) होऊन दाखवा" असं चॅलेंज मिळालं आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) युवा नेते मोहित कंबोज-भारतीय (Mohit Kamboj Bharatiya) यांनी संजय राऊतांना हे ओपन चॅलेंज (Open Challenge) दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेत (BMC) एकदा तरी नगरसेवक होऊन दाखवा, तुमच्या ताकदीचा सर्वात सुरक्षित वार्ड निवडा असा टोला कंबोज यांनी राऊतांना लगावला आहे. ("Become a corporator only once in BMC Election 2022" - Mohit Kamboj's open challenge to Sanjay Raut)

हे देखील पहा -

मोहिल कंबोज म्हणाले की, सलीम-जावेद जोडीतील संजय राऊतांना (Sanjay Raut) माझा सवाल आहे. ४० वर्षे आपण शिवसेनेत आहात, तर आजवर कोणतं इलेक्शन तुम्ही लढलात? देशभरात सगळीकडे शिवसेना आणि तिचा उमेदवार जिथे-जिथे तुम्ही प्रचारासाठी गेलात, तिथे तुमचे डिपॅाजिट जप्त झाले. माझं राऊतांना खुलं आव्हान आहे की, गोवा आणि युपीचं राहु द्या. मुंबई महापालिकेतला सर्वात ताकदीचा सेफ वॅार्ड निवडा आणि फक्त एकदा नगरसेवक होऊन दाखवा. बाकीच्या सर्व गप्पा राहु द्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (BMC Elections 2022) तुमची चाणाक्यनीती दाखवा असं म्हणत भाजप नेते मोहित कंबोज-भारतीय यांनी संजय राऊतांवर खोचक टिका केली आहे. आता या टिकेला राऊत काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com