BDD Chawl: वरळीत बीडीडी पुर्नवसन प्रकल्पाचा शुभारंभ

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते.
BDD Chawl:  वरळीत बीडीडी पुर्नवसन प्रकल्पाचा शुभारंभ
BDD Chawl: वरळीत बीडीडी पुर्नवसन प्रकल्पाचा शुभारंभ Twitter/@Satejpatil
Published On

सूरज सावंत

मुंबई : वरळीचा (Warali) बहुचर्चित बीडीडी पुर्नवसन प्रकल्पाचा (BDD chawl Rehabilitation Project) शुभारंभ आज वरळीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM udhav Thackeray), मंत्री जितेद्र आव्हाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पर्यावरण मंत्री व स्थानिक आमदार आदीत्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, पालकमंत्री अस्लम शेख आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वरळीकरांनी मोठ़्या प्रमाणात या कार्यक्रमाला गर्दी केली होती. (BDD Chawl: Launch of BDD Rehabilitation Project in Worli)

BDD Chawl:  वरळीत बीडीडी पुर्नवसन प्रकल्पाचा शुभारंभ
वयाच्या साठीत आजोबांनी बांधली 'लग्नाची गाठ'

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जाते. सन १९२० ते १९२४ या कालावधीत औद्योगिकरणामुळे शहरी भागांतून घरांची कमतरता प्रामुख्याने जाणवू लागली होती त्यामुळे मुंबई प्रोव्हिन्शिअल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉइड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच बीडीडीची स्थापना करून मुंबई शहरात गृहनिर्मितीची योजना तयार केली . या योजनेअंतर्गत वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ , नायगाव आणि शिवडी येथे सुमारे ९२ एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात आली.

वरळी येथे सर्वाधिक म्हणजे १२१ चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून ९ हजार ६८९ पुनर्वसन सदनिका (निवासी ९३९४ + अनिवासी २९५) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + ४० मजल्यांच्या ३३ पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार असून रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक सदनिकांमध्ये ८०० बाय ८०० मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार असून खिडक्यांकरिता पावडर कोटिंगचे अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक इमारतीमध्ये ३ पॅसेंजर लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट व १ फायर लिफ्टची सुविधा असणार आहे. पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ + ६ मजली पोडियम पार्किंग व दोन प्रशस्त जिने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व पुनर्वसन इमारती भूकंप रोधक असणार आहेत.

मागच्या अनेक वर्षांपासून बीडीडी चाळीच्या पुर्नविकासाची मागणी होतेय. अनेक घडामोडी, स्थित्यतंर या बीडीडी जाळीने पाहिली आहेत. 1995 साली पहिल्यांदा बीडीडी चाळीचा पुर्नविकास व्हावा अशी मागणी करण्यात आली. मागील भाजप सरकारच्या काळात शुभारंभाचा नारळ देखील फोडण्यात आला. माञ प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही. महाविकास आघाडी सरकारनं आज पून्हा शुभारंभाचा नारळ फोडलाय. 36 महिन्यात घराची चावी देण्याचं आश्वासन मिळालं आहे. या आश्वासनाची पूर्तता वेळेत होऊन, रहिवाशांना घराची हातात चावी मिळते का हे पाहणं महत्वाचं आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com