पुणे : घराबरोबरच महागड्या Expensive कारमध्ये गावठी दारुचा alcohol बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या एका महिलेसह दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने State Excise Department अटक Arrested केली आहे. गावठी दारुचे ६० प्लॅस्टिक कॅन असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने court आरोपीस ६ ऑगस्टपर्यंत पोलिस Police कोठडी सुनावण्यात आली आहे.
बावधन बुद्रुक Bavadhan Budruk याठिकाणी गुरूवारी ही कारवाई करण्यात आली आहे. विवेक मुकुटसिंग रजपूत (वय- ४१) रा. बावधन बुद्रुक, बिंदीया अनिल राजपुत (वय- ४६) रा. बावधन बुद्रुक असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पहा-
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. जे. डेरे यांनी फिर्याद दिली आहे. बावधन बुद्रुक गावाच्या हद्दीमध्ये फ्लेम कॅम्पस रस्त्यावर शेजारील एका बंगल्यात गावठी दारुचा बेकायदेशीरपणे साठा केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाने गुरूवारी बावधन बुद्रुक मधील क्षत्रीयनगर येथील त्रिशा बंगल्यामध्ये छापा मारण्यात आला.
त्यावेळेस बंगल्यामध्ये ३५ लिटरचे ३० कॅन, तर बंगल्याच्या आवारातमध्ये पार्कींग केलेल्या सॅंट्रो कारमध्ये (एमएच- १४, X ७४४४) प्लॅस्टिकचे १० कॅन असा असा १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. दरम्यान, बावधन बुद्रुक येथील भुंडे वस्ती परिसरामधील बिंदीया राजपुत हिच्या घरावर देखील पथकाने छापा मारण्यात आला होता. घरामधून १५ कॅन आणि अल्टो कारमधून (एमएच- १२ LJ १२७९) ५ कॅन असा १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.