Barsu Refinery Project: 'लोकांच्या जीवाशी खेळून आपला पक्ष वाढवणार असाल तर...', भास्कर जाधावांचा भाजपला इशारा

Latest News: बारसू रिफायनरीवर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी सरकारसोबतच भाजपवर जोरदार निशाणा साधला.
bhaskar jadhav
bhaskar jadhav saam tv
Published On

Mumbai News: कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) सर्वेक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. या सर्वेक्षणाला विरोध करत स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. पोलिसांनी (Ratnagiri Police) आंदोलन करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे.

या सर्वेक्षणावरुन आता राज्य सरकारवर (Maharashtra Government) विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत आहे. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)यांनी याप्रकल्पावरुन भाजपवर टीका करत थेट इशारा दिला आहे. 'लोकांच्या जीवाशी खेळून आपला पक्ष वाढवणार असाल तर तसं होणार नाही.', अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

bhaskar jadhav
Ajit Pawar On Barsu Refinery Project: 'पोलिस बळाचा वापर करुन दंडुकेशाहीने सर्वेक्षण करु नका', बारसू रिफायनरीवरुन अजित पवार संतप्त

बारसू रिफायनरीवर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी सरकारसोबतच भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'सरकारने दडपशाही करु नये. कोकणातील जनता समजून घेणारी आहे. आंदोलन करणारी लोकं ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत स्थानिक लोकं आहेत. लोकांच्या जीवाशी खेळू नये. असं करुन तुम्ही कोकणात तुमचा पक्ष वाढवू शकत नाही.', असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

त्याचसोबत, 'उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कधीही बदलली नाही. भाजपने भूमिका बदलली आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आम्ही स्थानिकांसोबत आहोत आणि कायम राहणार आहोत.', असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

bhaskar jadhav
Barsu Refienry Protest : 'बारसू'बाबतची उद्धव ठाकरे गटाची दुटप्पी भूमिका उघड : उद्योगमंत्री उदय सामंत (पाहा व्हिडीओ)

तसंच, 'या प्रकल्पाबद्दल जरी वेगवेगळी मत मांडली गेली असतील. पण खुलेआमपणे चर्चा घडवा. 1 लाख लोकांना नोकऱ्या कशा देणार?, 4 लाख कोटी खर्च करुन हा प्रकल्प कोकणाचे अर्थकारण कसं बदलवणार? हे त्यांनी जाहीर व्यासपीठावर सांगावं. मी स्वतः तिथं येतो. पण भाजपने हे धाडस दाखवले नाही.', अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. 'बारसू प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. स्थानिकांच्या मागणीसोबत शिवसेना कायम राहणार.', असं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

bhaskar jadhav
Sharad Pawar On Barsu Refinery Protest: 'सर्वे थांबवा, प्रोजेक्ट अडचणीत येईल...' बारसू रिफायनरी संदर्भात शरद पवारांची उदय सामंत यांच्याशी चर्चा

दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी विरोध करत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. या प्रकल्पाला विरोध करत रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली. पोलिसांनी या आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही आणि सर्वेक्षण करुन देणार नाही ही ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com