Bal Gandharva: पुण्यातील बालगंधर्व मधील कला दालनातील छताचा भाग कोसळला

Bal Gandharva POP Collapse: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कला दालनाचे पॉपचे छत कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या दुरवस्थेवर नागरिक आणि संघटनांनी कारवाईची मागणी केली आहे.
Bal Gandharva ceiling collapse
Bal Gandharva ceiling collapsegoogle
Published On

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची दिवसागणिक दुरवस्था होत चाललेली आहे. लाखो रुपये देखभाल दुरुस्तीवर खर्च करून देखील ही दुरवस्था कायम आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनाच्या छताचा भाग कोसळला असल्याचा आरोप आता करण्यात येतोय. बालगंधर्व मधील कला दालनातील पीओपीचे फॉल सिलिंग खाली कोसळले. सुदैवाने यावेळी दालनात कोणी नसल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

पतित पावन संघटनेने या घटनेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक म्हणाले, "पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे. ज्या कोणी संबंधित ठेकेदार याने या दालनाचे काम केलं आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

Bal Gandharva ceiling collapse
Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, पगार 100,000 रुपये; अर्जाची शेवटची तारीख काय?

पुणे महापालिकेचे आयुक्त यांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांना निलंबित करावे अन्यथा पतित पावन संघटना कुठला ही सांस्कृतिक कार्यक्रम होऊ देणार नाही. वेळ पडली तर आम्ही संबंधित अधिकाऱ्याला काळे फासले शिवाय राहणार नाही." दुसऱ्या बाजूला, पुणे महापालिकेने या घटनेची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी कला दालनाची पाहणी केली आहे.

पुणे महापालिका भवन विभागाचे प्रमुख रोहिदास गव्हाणे यांना या घटनेच्या बाबत विचारले असता ते म्हणाले, "काल संध्याकाळी आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. आम्ही त्वरित या घटनेची चौकशी करायला सुरुवात केली आहे. आज सुद्धा संबंधित विभागाच्या वतीने अधिकारी आणि कर्मचारी दालनाची पाहणी करत आहेत."

Bal Gandharva ceiling collapse
Fatty Liver: मधुमेह अन् लठ्ठपणामुळे वाढतो हा गंभीर धोका; गांभीर्य ओळखा, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com