डोंबिवली: डोंबिवली जवळील उबार्ली गावातील एका प्राध्यापकांनी आगरी समाजाच्या (Agri Society) विषयावर पीएचडी (Doctor of Philosophy - PHD) मिळवली आहे. यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. सुरेश तुकाराम मढवी (Professor Tukaram Madhavi) असं या प्राध्यापकांचं नाव असून ते डोंबिवली जवळील उंबार्ली गावात राहतात. (Avaliya, who is pursuing a PhD in Agari community; Studying from village to village)
हे देखील पहा -
गेल्या २३ वर्षांपासून मढवी हे कल्याणच्या (Kalyan) के. एम. अगरवाल कॉलेजमध्ये (K. M. Agrawal College, Kalyan) अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. स्वतः आगरी समाजात जन्मलेल्या सुरेश मढवी यांनी २०१४ सालापासून आगरी समाजाचा अभ्यास सुरू केला. यानंतर "ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास" या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. आगरी समाजात शिक्षणाची सुरुवात १९६० पासून झाली, त्यामुळे त्यापूर्वीचे कोणतेही लेखी संदर्भ उपलब्ध नसताना गावोगाव फिरून माहिती गोळा करत सुरेश मढवी यांनी या विषयाचा अभ्यास केला. आगरी कोळी समाज आद्यनिवासी असूनही विकासापासून वंचित असून आगरी समाजाचा परिचय इतर समाजांना व्हावा, या हेतूनं आपण हा विषय निवडल्याचं सुरेश मढवी यांनी सांगितलं.
दरम्यान, सुरेश मढवी यांची पीएचडी पूर्ण झाल्यानंतर कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील ग्रामस्थांना मोठा आनंद झाला आहे. सुरेश मढवी यांचं उंबार्ली गावात जंगी स्वागत करण्यात आले. सुरेश मढवी हे मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे राजू पाटील हे सुद्धा यावेळी मित्राचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. राजू पाटील यांच्यासह सर्व वर्ग मित्रांनी मिळून सुरेश मढवी यांचं स्वागत केलं. आपल्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं ग्रामस्थ आणि वर्गमित्रांनी सांगितलं. वर्ग मित्र आमदार राजू पाटील यांसह अन्य सहकारी देखील उपस्थित होते.
वर्गातील सहकाऱ्यांनी एकत्रित येत प्राध्यापक मढवी यांचा सन्मान केला आहे. गावाने जल्लोषात काढलेल्या मिरवणुकीनंतर समाजातील सर्व स्थरातून समाज बांधव एकत्र येत प्राध्यापक मढवी यांचा सन्मान केला आहे. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे सुखदेव पाटील, २७ गाव सर्व पक्षीय समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार,आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील, भागवताचार्य जयेश महाराज भाग्यवंत, प्रकाश महाराज म्हात्रे, काळू कोमास्कर, दत्ता वझे यांच्यासह समाजातील अनेक घटक उपस्थित होते.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.