राज्यातील जनतेची किमान दिवाळी तरी गोड करा; अतुल भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

कोरोना काळात काहीच मदत न करणाऱ्या राज्य सरकारने, आता तरी राज्यातील जनतेची दिवाळी गोड करावी
राज्यातील जनतेची किमान दिवाळी तरी गोड करा;  अतुल भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
राज्यातील जनतेची किमान दिवाळी तरी गोड करा; अतुल भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !Saam Tv
Published On

सुशांत सावंत -

मुंबई : कोरोनामुळे Corona आलेल्या आर्थिक अडचणीतून राज्यातील जनता अद्याप बाहेर पडलेली नसतानाच मुंबई, कोंकण आणि मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे Heavy Rain शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे अतीव नुकसान झाले आहे, दोन वेळचे अन्न मिळण्यासाठी सुद्धा अनेक परिवारांची परवड होत आहे. कोरोना काळात Coroan Period काहीच मदत न करणाऱ्या राज्य सरकारने State Goverment निदान आता तरी राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी याकरिता सर्व केसरी शिधापत्रिका धारक परिवारांना तेल, साखर सह इतर धान्य नाममात्र दराने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपा आ. अतुल भातखळकरांनी Atul Bhatkhalkar मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. (Atul Bhatkhalkar's letter to the Chief Minister)

हे देखील पहा -

कोरोना मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशभरातील सुमारे 80 कोटी नागरिकांना गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून वर्षभर मोफत अन्नधान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील नागरिकांची गरज लक्षात घेता केंद्र सरकारने Central Goverment पूर्वी एका वर्षासाठी असलेली हि योजना दिवाळी पर्यंत वाढवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी राज्यातील 7 कोटी नागरिकांना राज्य सरकारकडून एका महिन्याचे धान्य मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, मात्र केंद्र सरकार कडून गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून झालेल्या धान्य पुरवठ्यामुळे राज्य सरकारने घोषणा करूनही मोफत धान्य वाटप केलेलं नाही असं भातकळकर म्हणाले आहेत.

राज्यातील जनतेची किमान दिवाळी तरी गोड करा;  अतुल भातखळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
...म्हणून राज्य सरकारच्या विरोधात, 72 शेतकऱ्यांच्या मुलांनी केले मुंडण आंदोलन !

कोरोनाच्या काळात एका रुपयाचे सुद्धा पॅकेज Package जाहीर न करणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर देखील शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्त नागरिकांना कोणतीही मदत दिलेली नाही. किमान आतातरी आपल्या राज्याची तिजोरी मोकळी करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मदत करावी अशी मागणी सुद्धा भातखळकर यांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com