सुशांत सावंत -
मुंबई: मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीने राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना अटक केली. त्यानंतर भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी मलिकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका करत मविआच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे (Atul Bhatkhalkar criticize mahavikas aghadi leaders for protesting in support with Nawab Malik).
'दाऊदला नवाब मलिकांनी पैसा पुरवला, यावर शरद पवार यांनी बोलावे'
"मुंबईत हिंसाचार करुन 250 च्यावर प्राण घेणाऱ्या दाऊदशी ज्या नवाब मलिकने (Nawab Malik) आर्थिक संबंध ठेवले. त्याचा फ्रंट मॅन म्हणून काम केले. त्या नवाब मलिक यांच्या विरोधात महाभकास आघाडीची लोक धरणे आंदोलन करताहेत आणि हे धरणे आंदोलन कुठे करत आहेत तर महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुतळ्याजवळ. इतका ढोंगीपणा पाहून महात्मा गांधी यांचा आत्मा स्वर्गात तळमळला असेल", अशी बोचरी टीका अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केलीये.
दाऊदला नवाब मलिक यांनी पैसा पुरवला, यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलावे. आमची मागणी आहे शिवसेनेसकट सर्वांचे नवाब मलिक यांच्याशी काय लागेबांधे आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.