Mumbai: शैक्षणिक वर्ष संपताना पालिका विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणार टॅब

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Mumbai: शैक्षणिक वर्ष संपताना पालिका विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणार टॅब
Mumbai: शैक्षणिक वर्ष संपताना पालिका विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणार टॅबSaam TV

मुंबई: मुंबई महापालिका ३९ कोटी रुपये खर्चून म्हणजेच प्रत्येकी २०,५३२ रुपयांचे ऐकूण १९,४०१ इतके टॅब खरेदी करणार आहे. ४ महिन्यांच्या निविदा प्रक्रियेनंतर आता स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी हा प्रस्ताव येणार असून कार्यादेश मिळाल्यास दोन ते अडीच महिन्यात विद्यार्थ्यांच्या हातात टॅब (tablet computer) येणार आहेत. २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी मराठी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (At the end of the academic year, Mumbai Municipal Corporation will purchase tab computers for students)

हे देखील पहा -

महापालिकेच्या (BMC) कंत्राटातील अटीनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांचे टॅब ६० दिवसात आणि हिंदू,उर्दु माध्यमाचे टॅब ७५ दिवसात पुरवायचे आहेत. हे टॅब आता देतानाच पुरवठादाराला संबंधित विद्यार्थ्याला आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणं अनिवार्य असणार आहे. पण हे टॅब विद्यार्थ्यांच्या हातात येताना १० वीच्या विद्यार्थ्यांची कदाचित परीक्षा देखील होऊन जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास (Online Study) करणं सोईचं व्हावं यासाठी हे टॅब खरेदी केले जाणार होते. एड्युसपार्क इंटरनॅशनल प्रा. लि. ही कंपनी हे टॅब पुरविणार आहे. एक वर्षाच्या हमी बरोबरच पालिकेने चार वर्षांची जादा हमी या टॅबची घेतली आहे. याआधी २०१५ मध्ये पालिकेने २० हजार टॅब खरेदी केले होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com