विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक
विधानसभा अध्यक्ष पद निवडणूकsaam tv

विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक, महाविकास आघाडीचे मंत्री राज्यपालांची भेट घेणार

विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक येत्या मंगळवारी (28 डिसेंबर) पार पडणार आहे.

रश्मी पुराणिक -

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक येत्या मंगळवारी (28 डिसेंबर) पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे मंत्री हे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांशी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. - (Assembly Speaker Elections Mahavikas Aghadi Govt Will Meet Governor Bhagat Singh Koshyari)

अध्यक्षपदाकरता कोणाची नावे चर्चेत?

विधानसभेच्या अध्यक्षपदाकरिता (Assembly Speaker) अनुभवी नेत्याची निवड व्हावी, असा मुद्दा नेहमी पुढे येत असल्याने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव अध्यक्षपदाकरिता पुन्हा चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्याचे देखील त्यावर एकमत होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे विधानसभा अध्‍यक्षपदी आमदार चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार, अध्यक्षपदाकरता कोणती नावे चर्चेत?

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा (Assembly) अध्यक्षपदाची निवडणूक (Election) ही आवाजी मतदान पद्धतीने घेण्याविषयी निर्णय झाला. विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला होता.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहणार आहे. यामुळे काँग्रेसमधून अध्यक्ष पदाकरिता संग्राम थोपटे (Sangram Thopte), तर शिवसेनेकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याची माहिती आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com