ओबीसी आरक्षणासाठी मुंबईत भाजपकडून चक्का जाम; आशिष शेलार ताब्यात

आंदोलनदरम्यान पोलिसांनी आशिष शेलार यांच्यासह सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
ओबीसी आरक्षणासाठी मुंबईत भाजपकडून चक्का जाम; आशिष शेलार ताब्यात
ओबीसी आरक्षणासाठी मुंबईत भाजपकडून चक्का जाम; आशिष शेलार ताब्यातजयश्री मोरे
Published On

जयश्री मोरे

मुंबई: ओबीसी आरक्षण OBC Reservation वरून आज भाजप BJP ने राज्य भर चक्का जाम आंदोलन केले. मुलुंड Mulund येथील आनंद नगर टोल नाक्यावर भाजप नेते आशिष शेलार Ashish Shelar, खासदार मनोज कोटक Manoj Kotat यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम करण्यात आला. यावेळी आंदोलनदरम्यान पोलिसांनी आशिष शेलार यांच्यासह सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र कारवाई करून काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. Ashish Shelar arrested by Police in Mumbai for OBC reservation

आशिष शेलार यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली की, 'ओबीसी समाजाचे आरक्षण कोर्टासमोर Court योग्य पद्धतीने न मांडल्यामुळे आणि तसेही मुळातच याचिकाकर्ते हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, त्यांना संरक्षण महा विकास आघाडी Mahavikas Aghadi ने दिल्यामुळे हक्काचा राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर गेलं त्याचे पाप हे ठाकरे Thackrey सरकारचा आहे. हे सरकार काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आहे. याविरुद्ध एलगार म्हणजे हे चक्काजाम आंदोलन आहे. पण 'ये तो सिर्फ अंगडाई है आगे और लढाई है' जर हे आंदोलन चिघळले तर याची सर्वस्वी जबाबदारी ही ठाकरे सरकारची राहील.

हे देखील पहा -

त्याच प्रकारे आशिष शेलार हे मराठा आरक्षणावर देखील बोलले. मराठा आरक्षण जेव्हा फडणवीसांनी Devendra Fadnavis दिलं उच्च न्यायालयात High Court टिकलं सर्वोच्च न्यायालयात टिकलं. मात्र सरकार ठाकरे सरकार आल्यानंतर घालवलं हा कट मराठा आरक्षणाच्या विरोधातला ठाकरे सरकारचा होता. त्याला जाब विचारण जनतेचे काम आहे. त्याच्या सोबत भाजप BJP राहील. उद्या होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनात पक्षाच्या झेंड्या वीणा भाजप मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होणार असल्याचं शेलार यांनी म्हटले.

ईडीच्या कारवाईवर संजय राऊतांनी देखील दिली प्रतिक्रिया:

आमच्यामागे तपास संस्था लावल्या गेल्या आहेत आम्ही बघून घेऊ असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत Sanjay Rout यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या घरांवर ईडीने ED टाकलेल्या छाप्यानंतर दिला आहे. यावर शेलार यांनी प्रती उत्तर दिलं आहे. संजय राऊत संजय राऊत आहेत. ते संजय दाऊद नाही अश्या प्रकारे जे दाउदी भाषा करतील त्याला जेल हे निश्चित आहे.

ओबीसी आरक्षणासाठी मुंबईत भाजपकडून चक्का जाम; आशिष शेलार ताब्यात
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसींना बसणार फटका !

मनोज कोटक हे यावेळेस म्हणाले कि, ओबीसी समाजाचे आरक्षण या सरकार च्या नाकर्तेमुळे गेले आहे, या साठी भाजप ने आंदोलन केले आहे, हे आंदोलन सुरूच रहानार असल्याचं भाजप चे आमदार मनोज कोटक यांनी म्हटले आहे.

देशमुखांवर कोर्टाच्या आदेशाने ही कारवाई होत आहे. देशमुख यांच्या पीए ला अटक झाली. ती आता माजी गृहमंत्री पर्यंत जाणार. संसदेत मी मागणी केली होती, सीबीआय चौकशी करावी मागणी केली होती. एपीआय ला 100 कोटीचे टार्गेट देणाऱ्या गृहमंत्र्यांच्या स्टेटमेंट मध्ये हे आले आहे. ज्या प्रमाणे लूटमार सुरू होती, निश्चित यात आणखी मंत्री अडकतील असा इशारा मनोज कोटक यांनी दिला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com