Aryan Khan: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी ६ हजार पानांचे दोषारोपपत्र, आर्यन खानला क्लीन चिट

मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे.
Aryan Khan Cruise Drugs Case Latest News
Aryan Khan Cruise Drugs Case Latest NewsSAAM TV
Published On

मुंबई: मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या जामिनावर असलेला आर्यन खान (Aryan Khan) याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं क्लीन चिट दिली आहे. NCB ने आज, शुक्रवारी कोर्टामध्ये या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केले. एनसीबीने कोर्टात दाखल केलेले हे दोषारोपपत्र ६ हजार पानांचे आहे.

Aryan Khan Cruise Drugs Case Latest News
Aryan Khan : आर्यन खान निर्दोष होता?, NCB SITच्या तपासात सत्य समोर, पाहा काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Cordelia cruise drugs case) अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यासाठी कोर्टानं अवधी वाढवून दिला होता. हा जवळपास दोन महिन्यांचा कालावधी संपला. त्यानंतर एनसीबीने या प्रकरणात आज, शुक्रवारी कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे. जवळपास ६ हजार पानांचे हे दोषारोपपत्र असून, त्यात आर्यन खानसह सहा जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यात अविन साहू, गोपाल आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा, मानव सिंघल यांचा समावेश आहे.

Aryan Khan Cruise Drugs Case Latest News
Aryan Khan : आर्यन खानबाबत अतिशय मोठी बातमी, आर्यनकडे ड्रग्ज सापडलेच नाहीत ; पाहा व्हिडीओ

आर्यन खानला गेल्या वर्षी कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने छापेमारीदरम्यान अटक केली होती. आर्यन खानसह इतर काही जणांनाही अटक झाली होती. त्यांच्याकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा करण्यात आला होता. काही आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खान याला जामिनावर सोडण्यात आले होते.

दरम्यान, कोर्टाने दिलेला ६० दिवसांचा अवधी संपल्यानंतर एनसीबीने विशेष कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला आरोपी करण्यात आले नाही. आर्यन आणइ मोहक यांच्याकडे ड्रग्ज आढळले नाहीत. इतर सर्व आरोपींकडे ड्रग्ज सापडले आहेत. एनसीबीच्या माहितीनुसार, इतर १४ आरोपींविरोधात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आर्यन खानसह ६ जणांविरोधात सबळ पुराव्यांअभावी तक्रार दाखल करण्यात येणार नाही.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com