नागपूर: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हे नागपूरमध्ये आहेत. 'आम आदमी पार्टी आणि 2024 लोकसभा निवडणूक' या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल बोलत होते. त्यात बोलताना केजरीवाल म्हणाले की आमच्यासमोर 2024 च्या निवडणूका हे लक्ष नाही. आमच्यासमोर देश महत्वाचे आहे, सत्ता काबीज करण्यासाठी आम्ही आलो नाही, देश वाचविण्यासाठी आलो आहोत, आमचे करियर सोडून आलो आहोत. मी देवाला दोन गोष्टी मागतो, माझा देश नंबर 1 बनो, त्यात माझा रोल काय असेल, जोपर्यंत भारत नंबर वन देश बनणार नाही, तोपर्यंत मी मरू नये. आम्हाला राजकारण करता येत नाही, फक्त काम करणे जमते असे केजरीवाल म्हणाले आहेत.
केजरीवालांनी वाचला विकास कामांचा पाढा
राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, आम्हाला राजकारण, गुंडागर्दी, भ्रष्टाचार करता येत नाही. आम्हाला काम करणे आवडते, तुम्ही दिल्लीत चला, शाळा बघा कशा बनविल्या आहेत. महाराष्ट्रात शाळांची स्थिती वाईट आहे. दिल्लीतील शाळा अतिशय वाईट होत्या. दिल्लीतील सरकारी शाळांचे निकाल 99.9 टक्के आले आहेत. दिल्लीत यावर्षी 4 लाख खाजगी शाळेतून नाव काढून सरकारी शाळेत टाकले आहे. 16 लाख विद्यार्थी सरकारी शाळेत शिकतात, या विद्यार्थ्यांचे भविष्य काहीही नसते, जर या शाळा चांगल्या केल्या नसत्या. सरकारी शाळेतील 450 विद्यार्थी IIT मध्ये शिकत आहेत. सरकारी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देश विदेशात ट्रेनिंग दिले जाते. आम्हाला हे करता येते, राजकारण करता येत नाही असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी आपण दिल्लीत केलेल्या कामाचा पाढा वाचला.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना उद्योजकांना सांगितल्या, अन्...
सरकारी शाळेतील मुलांना मेडिटेशन द्वारे हॅप्पीनेस क्लास चालवितो, मुले घरातील वातावरण विसरून चांगल्या वातावरणात शिकतात. अमेरिकेचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आल्यावर या हॅपीनेस क्लास मध्ये आले, ही शिक्षा पद्धती इंग्रजांनी केली होती. यावर आम्ही समाधान काढले, आम्ही विद्यार्थ्यांना 9 वी आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय करणे शिकविले. आम्ही मुलांना 2 हजार रुपये देतो, दिल्लीत 52 हजार विद्यार्थ्यांच्या टीम बनविल्या आहेत. मोठे उद्योजक आले, त्यांना या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना उद्योजकांना सांगितल्या, त्यातून मुलांनी चांगले पैसे कमविले, बदलाव जरुरी हे, आम्ही पकोडे नाही बनविले. आम्ही दिल्लीत सरकारी रुग्णालय चांगले केले. मोहल्ला क्लीनिक, पोली क्लीनिक, सुपर स्पेशालिटी असे तीन स्तरातील रुग्णालय तयार केले असेही केजरीवाल म्हणाले.
जर मी मुलांना मोफत शिक्षण देत असेल तर चुकीचे काय?
दर सोमवारी मी अहवाल घेतो, मेडिकल साहित्य सुरळीत सुरू आहे का?, दिल्लीत गरीबांना मोफत उपचार दिला जातो का? दुसऱ्या पक्षातील लोक मला शिव्या देतात. देशातील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे की नाही, जर मी मुलांना मोफत शिक्षण देत असेल तर चुकीचे आहे का, मला म्हणतात मोफत शिक्षण देतो. माझे सेटिंग नाही खाजगी शाळांसोबत. मोठा आजार झाला तर खूप खर्च होतो, जवळचे असले नसले सर्व संपते, मग मी मोफत उपचार देत असेल तर काय चूक करतो, कारण माझे खाजही रुग्णालयासोबत सेटिंग नाही.
मोफत वीज, मोफत योगा, मोफत तीर्थ यात्रा देतो. मोफत देतो म्हणून माझ्यावर टीका करतात, मात्र आमचं सरकार आलं तर 200 युनिट मोफत देऊ असं म्हणतात. मोठ मोठे नेते फ्री उपचार, फ्री वीज घेतात. भ्रष्टाचार बंद केला म्हणून मी मोफत देतो, अर्थशात्री माझ्या विरोधात लिहताय, मोफत देतो म्हणून, मात्र भ्रष्टाचार बंद व्हावे म्हणून लिहत नाही असे म्हणत केजरीवालांनी बड्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.