रश्मी पुराणीक -
मुंबई : प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुंबई बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच बँकेवरती अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी आता देखील मजूर संस्थेमार्फत मुबै बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे मात्र त्यांच्या या अर्जावरती सहकार विभागाने आक्षेप घेतला आहे.
हे देखील पहा -
तसंच या प्रकरणी दरेकरांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे या नोटिशीत त्यांना विचारण्यात आलं आहे की 'आपण मजूर आहात की नाही'...
दरम्यान प्रवीण दरेकरांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये दाखवली आहे. आणि दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना 2 लाख 50 हजार रुपयांचे मानधनही मिळतं असल्याने दरेकर प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नाही असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मजूर संस्थेच्या नियमांनुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे याबाबत प्रविण दरेकर यांना 21 डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत सांगितल्याचही नोटीसीत नमूद केलेलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.