भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

एका वकिलासह 5 जणांचा समावेश, प्रचंड खळबळ
भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखलसागर आव्हाड

पुणे - भाजप नगसेवक धनराज घोगरे Dhanraj Ghogare यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नगरसेवक धनराज घोगरे , सहदेव लक्ष्मण ढावरे, सुरेश तेलंग, विनोद माने पाटील, अ‍ॅड. अतुल पाटील तसेच घोगरे यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या इतर दोघांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

महापालिकेतील कामे मिळवून देतो, असे सांगून ठेकेदारांकडून ३ लाख रुपये घेतल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात भाजप नगरसेवकाने फिर्यादीचे अपहरण करुन कुटुंबाला संपविण्याची धमकी देऊन अ‍ॅफिडेव्हिटवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड उघडकीस आला.

भाजप नगसेवक धनराज घोगरे यांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
सिद्धेश्वर, हुतात्मासह १६ एक्सप्रेस आजपासून पुन्हा धावणार!

ठेकेदाराने लघवीचा बहाणा करुन कोर्टातून पलायन करुन दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने हा संपुन प्रकार उघडकीस आला आहे. निखील रत्नाकर दिवसे यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक कामठे अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com