मुंबई : अनेक दिवसांपासून सुरु असलेला एसटी कामगारांच्या ST workers संपाबाबत आज बैठक परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांची बैठकपार पडली त्याबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी एसटी कामगारांना संप मागे घेण्याच आवाहन केलं आहे. ते म्हणाले 'आजची बैठक अंतर्गत होती. कालपासून जो संप सुरू आहे त्याबाबत जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून काय करता येईल यावर चर्चा झाली. 3 मागण्या होत्या त्या पूर्णपणे मान्य केल्या पण नवी मागणी जी केली आहे की विलीनीकरण करावं हायकोर्टाने निर्देश दिले त्याच पाल केलं असून त्यासाठी कमिटी स्थापन केली कमिटी 12 आठवड्याच्या आत पूर्ण तपशील मुख्यमंत्र्यांकडे देणार आधी मुख्यमंत्री हायकोर्टकडे सांगतील सरकार कोर्टाच्या आदेशाचे पालन करत आहे.'
हे देखील पहा -
संपाविरोधात कोर्टाने आदेश दिला (The court ordered) आणि बेकायदेशीर ठरवलं हायकोर्ट ने बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलं. अवमान याचिका दाखल करण्याबाबत कोर्टाने सांगितले महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे. आमच्याकडून जे करायचं होत ते केलं आहे. कमिटी निर्णय काय करेल याबाबत पाहावं लागेल. यशस्वी आणि चांगला मग काढण्याचा मी प्रयत्न करत आहे. महंडाळावर आर्थिक भार प्रचंड आहे परिस्थिती खालावली आहे 12 हजार कोटी संचित तोट्यात आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करणार आंदोलन बेकायदेशीर आहे. कर्मचाऱ्यांनी आर पार ची लढाई करू नये मला कर्मचार्यांबाबत सहानुभूती आहे पालकमंत्री म्हणून मी प्रयत्न करत आहे.
मी त्यांच्या नेत्यांशी बोलत आहे वातावरण खराब होऊ नये अशीच इच्छा आहे कोणीतरी भडकवतोय म्हणून कामगारांनी चिडू नये मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं सर्वांचा सामोपचाराने विचार करून निर्णय घेऊ अनेक महामंडळाचा विलीनीकरण मुद्दा आहे धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. तसेच 1-2 दिवसात निर्णय होत नाही चर्चेला या आम्ही दार उघडी ठेवलीय संप करून जनतेकला वेठीस धरू नये संप मिटवा अस आवाहन केलं आहे. RTO ची बैठक घेतली लोकांची लूट होऊ नये यासाठी बोलणी झाली. दीड पट भाव लावण्याची परवानगी आहे पण ST बाबत जे दर आहेत तेच आकारण्यात यावे अस बोलणं सुरू असल्याचही परब यांनी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.