Anil Deshmukh And Sitaram Kunte
Anil Deshmukh And Sitaram KunteSaam Tv

100 Crore Case: अनिल देशमुखच घेत असत पोलिसांच्या बदल्यांचे निर्णय...

Anil Deshmukh 100 Crore Case: अनिल देशमुखांनी पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अतिरिक्त सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे दिली होती. ED ने नुकतेच वसूली प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
Published on

मुंबई: महाराष्ट्र पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी आणि १०० कोटी वसूली प्रकरणी ईडीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (sitaram kunte) यांना ईडीनं समन्स (enforcement directorate summons) बजावल्यानंतर ईडी कार्यालयात त्यांची चौकशी (investigation in ED office) करण्यात आली होती. अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे बहुतांश निर्णय हे देशमुखच (Anil Deshmukh) घेत होते अशी माहिती सीताराम कुंटेंनी ईडीच्या चौकशीत दिली आहे. (100 Crore Case: Anil Deshmukh used to take decisions of police transfers information given by sitaram kunte to Ed in Enquiry)

हे देखील पहा -

अनिल देशमुखांनी पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अतिरिक्त सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे दिली होती. ED ने नुकतेच वसूली प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ED च्या चौकशीत कुंटेंनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधून ४० कोटी रुपये घेतल्याचे अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी आरोपी सचिन वाजे याने ईडी समोर कबूली दिली आहे. तसेच हे पैसे देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि परब यांचे बजरंग खरमाटे (सह आयुक्त आरटीओ) यांना दिल्याचे वाजेने चौकशीत सांगितले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या 100 कोटीच्या घोटाळ्यात ईडीला काही चौकशी करायची असल्याने सीताराम कुंटे यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी याप्रकरणाची चौकशीही झाली होती. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना सीतीराम कुंटे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com