Anil Deshmukh : 'मला खोट्या आरोपाखाली अडकविण्यात आलं; तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुखांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
Anil Deshmukh
Anil Deshmukh Facebook
Published On

Anil Deshmukh News : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. अनिल देशमुख मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडले आहे. ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुखांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'मला खोट्या आरोपाखाली अडकविण्यात आलं, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला. (Latest Marathi News)

Anil Deshmukh
Anil Deshmukh : अनिल देशमुखांची तुरुंगातून सुटका; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण

अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अनिल देशमुख म्हणाले, 'मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केले. त्यांची चांदीवाल आयोगाकडे प्रतीज्ञापत्र सादर करत म्हटलं की, मी अनिल देशमुखांवर जे आरोप केले आहेत ते ऐकीव माहितीवर केले आहेत, माझ्याकडे याबाबत पुरावे नाहीत'.

'हायकोर्टाच्या निर्णयामध्ये सचिन वाझे याने केलेल्या आरोपांवरही स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सचिन वाझेने माझ्यावर जे आरोप केले, त्याबद्दल न्यायमूर्तीनी हे आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे म्हटले आहे. गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे,असे देशमुख पुढे म्हणाले.

Anil Deshmukh
Lokayukt Bill Pass: लोकायुक्त विधेयक विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत मंजूर; मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत, पण...

'माझ्यावरील आरोपांत तथ्य नाही. न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे. शरद पवार साहेब सर्व नेते कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. खोट्या गुन्ह्यात मला १४ महिने तुरुंगात राहावे लागले याचे दुःख आहे, अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com