Tiger Project : राज्यातील पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार होणार: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar: वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंसाठी यापुढे “वनामृत” हा एकच ब्रँड वापरण्याचा निर्णय मुनगंटीवार यांनी जाहीर केला.
Tiger Project
Tiger ProjectSaam tv
Published On

Tiger Project :

राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपले वैभव आहे. हे वैभव जगापुढे येणे आणि पर्यटकांना त्याठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या सोयीसुविधांमध्ये एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पाचही व्याघ्र प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंसाठी यापुढे “वनामृत” हा एकच ब्रँड वापरण्याचा निर्णयही मुनगंटीवार यांनी जाहीर केला. राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री वन मुनगंटीवार म्हणाले की, पाचही व्याघ्र प्रकल्पाचा पाच वर्षासाठी एकत्रित पर्यटन आराखडा तयार करण्यात यावा. एखाद्या व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबविले गेले असतील तर त्याची इतर ठिकाणी अंमलबजावणी करता येईल का, याचा विचार व्हावा. व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण त्याठिकाणी राहील, हे पाहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

Tiger Project
Breaking News: मोठी बातमी! संजय राऊत यांच्या भावाला ईडीचे समन्स, काय आहे प्रकरण?

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा, सेल्फी पॉईंटसची निर्मिती करावी. तेथील परिसरातील गावातील घरांच्या भिंतीवर वन्यजीव आणि पर्यावरणपूरक चित्रे रंगवून अधिकाधिक वातावरण निर्मिती करावी. स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, येथील महिला- युवक यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळेल, यासाठी प्रयत्न करणे, व्याघ्र प्रकल्पाद्वारे निर्मित वस्तू्ंचे योग्य ब्रॅंडिंग होईल, त्यामध्ये एकसमानता असेल, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.  (Latest Marathi News)

या प्रकल्पातील बांबू झाडांच्या फुलोऱ्याचे व्यवस्थापन करणे, बीज साठवण, अग्नी संरक्षण या बाबींकडे अधिक गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाने त्यांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी क्यूआर कोड तयार करावा. ज्याठिकाणी नदी, तलाव आहेत, तेथे हाऊसबोट सारखी संकल्पना राबवावी.

Tiger Project
Halwa Ceremony: नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा समारंभ, 1 फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प

पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पात वंदे मातरम वनसेवा केंद्र सुरु करण्यात यावे. ज्याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रांवर राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळते, त्याप्रमाणे वन विभागाच्या योजनांची माहिती आणि सेवा या केंद्रातून सुरु करण्याचे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. विविध व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबवले जात आहेत. ते त्याच प्रकल्पापुरते मर्यादीत न राहता त्याची अंमलबजावणी इतरही प्रकल्पात करण्यात यावी, यासाठी एक समिती नेमून त्याआधारे अभ्यास करुन एका महिन्यात त्यासंबंधी कार्य अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सध्या सर्व व्याघ्र प्रकल्पांना त्यांच्या कामाबद्दल केंद्रीय यंत्रणेने अधिक चांगला शेरा दिला आहे. हा शेरा कायम उत्कृष्ट राहील, यासाठी सर्वांनी काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com