संजय गडदे
Mumbai News : मुंबईच्या (Mumbai) बोरीवली पूर्वेकडील रत्नाकर सी एच एस टाटा पॉवर येथे राहणाऱ्या जोडप्याने आजारपणास कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला झोपेच्या गोळ्या खाऊन या वृद्ध जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यात पत्नीचा मृत्यू झाला असून पतीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम सुर्वे (७७ वर्षे) आणि सविता दत्ताराम सुर्वे (७६ वर्षे) हे वृद्ध दांपत्य बोरिवली पूर्वेतील रत्नाकर सी एच एस इमारतीत राहत आहे. त्याच इमारतीत त्यांचा मुलगा देखील रहात आहे. हे वृद्ध दांपत्य मागील अनेक वर्षांपासून आजारी आहे. सविता सुर्वे यांना मागील पंधरा-वीस वर्षापासून डायबिटीसचा आजार होता.
तसेच त्यांना डोळ्यांना दिसत नव्हते व अंथरुणावर खिळून होत्या व अंथरुणातच नैसर्गिक विधी करत असत आणी त्यांचे पती दत्ताराम सुर्वे यांना मागील २५ वर्षांपासून हृदय विकाराचा त्रास होता. त्यांची बायपास सर्जरी करण्यात आली होती. तसेच त्यांचे हार्टचे काउंट कमी असल्यामुळे पेस मेकर बसवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा हात व छातीत खूप दुखत असे.
त्यांच्यावर औषधोपचार करूनही आजारातून सुटका होत नसल्याने या वृद्ध दांपत्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली यात सविता सुर्वे यांचा मृत्यू झाला असून पती दत्ताराम सुर्वे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शिवाय 2020 मध्ये त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते.
17 नोव्हेंबरच्या सकाळी सव्वा सहा वाजता त्याच इमारतीत राहणारा त्यांचा मुलगा सचिन सुर्वे नेहमीप्रमाणे आई-वडिलांना नाश्ता देण्यासाठी गेला असता दरवाजा उघडला गेला नाही म्हणून त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता त्यांचे आई-वडील बेडवर झोपलेल्या स्थितीत होते व शरीर पूर्णपणे ताठरलेले होते. वडील दत्ताराम सुर्वे हे अस्पष्ट बोलत होते म्हणून त्यांना उपचारासाठी सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करून घेतले.
दत्ताराम सुर्वे हे सध्या बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांचा जबाब अजून नोंदवला नाही मात्र याबाबत कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे अपमृत्यू कलम 174 crpc अन्वये नोंद करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.