Amruta Fadnavis News, Ulhasnagar,  aniksha jaisinghani
Amruta Fadnavis News, Ulhasnagar, aniksha jaisinghanisaam tv

Aniksha Jaisinghani News: अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण, अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Aniksha Jaisinghani News: अनिक्षाला 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

सचिन गाड

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल प्रकरणी डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर झाला आहे. अनिक्षाला 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

डिझायनर अनिक्षाने तिच्या वडिलांवरील (अनिल जयसिंघानी) फौजदारी खटला मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देऊ केली असं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Amruta Fadnavis News, Ulhasnagar,  aniksha jaisinghani
Solapur News : सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याची पक्षाला सोडचिट्ठी

कोण आहे अनिक्षा जयसिंघानी?

अनिक्षा जयसिंघांनी सट्टेबाज अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. अनिल जयसिंघानी विरोधात अनेक केसेस आहे. अनिक्षा जयसिंघानी हिने 2015-16 मध्ये अमृत फडवणवीस यांनी भेट घेतली होती. यानंतर मात्र 2021 पर्यंत अनिक्षा अमृता फडणवीस यांच्या संपर्कात नव्हती. काही वर्षांनी अनिक्षाने अमृत फडणवीस यांच्याकडे वडिलांना क्लिन चीट मिळावी यासाठी मदत मागितली. (Latest Marathi News)

Amruta Fadnavis News, Ulhasnagar,  aniksha jaisinghani
Trupti Desai News: महिला आपल्या पुढे गेलेली बघवत नाही, तृप्ती देसाईंची इंदुरीकरांवर टीका; तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो...

अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनुसार, अनिक्षाने त्यांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर दिली होती. मात्र नकार दिल्यानंतर अनिक्षाने त्यांना काही ऑडिओ आणि व्हिडीओ सेंड करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमृता फडणवीस यांनी अनिक्षाचा नंबर ब्लॉक केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com