Ajit Pawar: राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार

अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असंही अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

मुंबई: राज्या यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पीक कुजून गेली आहेत. यातच राज्याती मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. अतिवृष्टी सुरू झाल्यापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे ताबडतोब अधिवेशन बोलवून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज केली.

तुमच्या सरकारला बहुमत आहे तर मग तुम्हाला अधिवेशन घ्यायला कुणी अडवले आहे. आम्ही आमच्या मागण्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशी परिस्थिती असताना सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तार करत नाहीत, हा राज्यातील १३ कोटींचा अपमान आहे, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Ajit Pawar
जनतेला जमिनीवरचा नेता हवा; गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंना टोला

शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देण्यासाठी ताबडतोब अधिवेशन बोलवले पाहिजे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन घेणार असल्याचे बोलले जात आहे. पण हे सरकार अधिवेशन घेतच नाही. तुम्ही या बद्दल उत्तर दिले पाहिजे.

पावसामुळे पंचनामे अजुनही झालेल नाही. तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. सध्या नवा जीएसटी लावलेल्या आहे. केंद्र सरकार जीएसटी लावून राज्यावर अन्याय करत आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

Ajit Pawar
Health tips : रात्री सतत झोप मोड होतेय ? या पदार्थांचा आहारात समावेश करा

गेल्या दोन दिवसांपासून काल तिरूपती बालाजी येथे शिवाजी महाराजांच्या व्हिडिओ व्हायरल होत आहे, यावर बोलताना पवार (Ajit Pawar) म्हणाले की, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराजांबद्दल खोट्या बातम्या पसरवणं चुकीचं असून मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.

हवामान खात्याचे अंदाज सध्या चुत आहे. पुण्यात रेड अलर्ट दिला पण पुण्यात काही दोन दिवस पाऊस पडलाच नाही. आम्ही हा विषय सभागृहात मांडणार आहे, असंही पवार(Ajit Pawar) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com