मुख्यमंत्री शो मॅन ! अजित पवार म्हणाले गणपतीला आम्हीही जाताे पण... (पाहा व्हिडिओ)

विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी दसरा मेळाव्याबाबत माध्यमांना स्पष्टच सांगितलं.
ajit pawar
ajit pawarsaam tv
Published On

Ajit Pawar : गणेशाेत्सव हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे पण याआधी कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. आम्हीही गणपतीच्या (ganpati) दर्शनाला जातो मात्र मीडियाचे कॅमेरेसोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत अशी टीका विराेधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचा नामाेल्लेख टाळत केली.

त्यानंतर समजेल खरी शिवसेना कोणाची

शिवतीर्थ मैदानासंदर्भामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी घडल्यात ते सगळ्यांनी पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. दाेघांचे कार्यक्रम हाेतील पण निवडणुका झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची असंही अजित पवार यांनी नमूद केले.

ajit pawar
Udayanraje Bhosale : पाडा त्यांचे बांधकाम ! 'कास' अतिक्रमणावरुन उदयनराजेही भडकले

काँग्रेसचे आमदार फुटणार याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची भेट झालेली नाही. सध्या मीडियाला कोणत्याही बातम्या नाहीत म्हणून अशा बातम्या दिल्या जात असल्याचे स्मित हास्य करीत पवार यांनी नमूद केले.

दरम्यान राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीला धरून सुरू आहे का ? यावर अजित पवारांनी यावर विचार व्हायला हवा असं म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

ajit pawar
Bullock Cart Race Ban : आयाेजकांनाे ! बैलगाडा शर्यतींवर आली बंदी; जाणून घ्या कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com