Ajit Pawar Banner: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री… पुण्यात अजित पवार यांचे बॅनर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politics: पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे पुण्यातील कोथरूड परिसरात झळकलेले बॅनर आहे.
Ajit Pawar Banner
Ajit Pawar BannerSaam Tv
Published On

सचिन जाधव

Pune News: गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांची (Ajit Pawar) राज्याच्या राजकारणामध्ये तुफान चर्चा आहे. या सर्व चर्चांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत पडदा टाकला होता. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे पुण्यातील कोथरूड परिसरात झळकलेले बॅनर आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Banner
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी GOOD NEWS! सोमवारपासून मेट्रोच्या 8 नव्या फेऱ्या;वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार

अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यातील (Pune) कोथरूड परिसरात झळकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील हे बॅनर्स पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काल सकाळच्या मुलाखती मध्ये अजित पवारांनी यांनी राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं आकर्षण नाही, २०२४ कशाला आमची आताही मुख्यमंत्रीपदावर दाव्याची तयारी आहे असं वक्तव्य केलं होत त्यानंतर संध्याकाळी अचानक कोथरूडमध्ये अजितदादांचे बॅनर्स लागले.

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे या बॅनर्सवर लिहिलेलं आहे. या बॅनर्सवर अजितदादा पवार यांचा भला मोठा फोटो आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचं आणि फोटोही आहेत. (Breaking Marathi News)

Ajit Pawar Banner
Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त; एका SMS वर चेक करा नवीनतम दर

काय म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपदाचं आकर्षण नाही, २०२४ कशाला, आमची आताही मुख्यमंत्रीपदावर दाव्याची तयारी आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत केलं.

यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीच्या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला. ज्या गोष्टीला साडेतीन वर्ष झाली. त्यावर मला भाष्य करायचं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, मुख्यमंत्री पदावर आमचा अजूनही दावा असल्याचं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com