हिवाळा म्हटला की गुलाबी थंडीची अनुभूती येते. मात्र हीच थंडी अलिकडे मोठ्या शहरांना तापदायक ठरत आहे. हिवाळ्यात आला की या शहरांमध्ये हवा प्रदूषण ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. मुंबईत अलिकडे हवेच्या गुणवत्ता पातळीत कमालीची घट पहायला मिळाली आहेत. यातून नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम जाणवत आहेत, विशेषतः श्वसनाचे आजार, हृदयविकार आणि इतर अनेक समस्या निर्माण होतात. मात्र हिवाळ्यातच हवा प्रदूषणाचा धोका का वाढतो आणि PM (पार्टीक्युलेट मॅटर) पातळी म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
PM म्हणजे पार्टीक्युलेट मॅटर. हे हवेतील सूक्ष्म कण आहेत, ज्याचा व्यास 10 मायक्रॉन (PM10) किंवा 2.5 मायक्रॉन (PM2.5) पर्यंत असू शकतो. PM2.5 विशेषतः अधिक धोकादायक आहे, कारण हे कण श्वसनमार्गाद्वारे थेट फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या आणि हृदयविकार यांचे प्रमाण वाढते. PM पातळी मोजण्यासाठी विशेष यंत्रांचा वापर केला जातो.
हिवाळ्यात तापमान कमी असतं त्यामुळे हवेत दव असतं. ज्यामुळे अनेक औद्योगिक प्रकल्प, वाहने, बांधकाम प्रकल्पातून निर्माण होणार कण, घटक या हवेत साचतात. हवेचा थर आधीच खाली असतो आणि त्यात हवेतीला दवामध्ये हे कण मिसळव्यामुळे हवेचा थर आणखी खाली येतो. याला थर्मल इन्वर्जन असे म्हणतात, ज्यामध्ये हवेच्या वरच्या स्तरांमध्ये तापमान अधिक आणि खालच्या स्तरांमध्ये कमी असते. त्यामुळे प्रदूषणाची कण याठिकाणी बंदिस्त राहतात आणि जमिनीलगत पसरतात. तापमान जास्त असतं त्यावेळी हवेत आर्द्रता कमी असते. त्यामुळे हवा कोरडी असते आणि हे धुलीकण हवेच्या वरच्या थरामध्ये जातात.
औद्योगिक प्रकल्प, वाहने, यांत्रिक उपकरणे यामधून मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होतं. अलिकडे मुंबई, नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये याचे परिणाम दिसू लागले आहेत.हिवाळ्यात घरांमध्ये उष्णता टिकवण्यासाठी जळणाचा वापर वाढतो, ज्यामुळे धूर आणि प्रदूषण वाढते. खासकरून ग्रामीण भागांमध्ये, परंपरागत जळणांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, ज्यामुळे हवेतील PM पातळी वाढते.अनेक ठिकाणी, खासकरून शहरी भागांमध्ये, कचरा जाळला जातो त्यामुळे हवा प्रदूषित होते. हिवाळ्यात, कचऱ्याची जळवण अधिक प्रमाणात केली जाते, कारण तापमान कमी असते आणि धूर कमी पसरतो.
हवेतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळ्यामुळे विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. श्वसनाचे आजार, जसे की दमा, फुफ्फुसांचे विकार, आणि हृदयविकार यांचे प्रमाण वाढते. तसेच, प्रदूषणामुळे संज्ञानात्मक विकार, हृदयरोग, आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो.
संथ आणि रहदारी असणारे मार्ग, प्रदूषणाला कारणीभूत असलेले उद्योग असलेली ठिकाणं, बांधकाम निर्माण आणि पाडण्याची ठिकाणं, कोळशावर आधारित उद्योग या उच्च प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी जाणं टाळावं.
हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर बाहेर जाणं टाळा.
सकाळी आणि संध्याकाळी घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा.
सकाळी व्यायामाला जाणं टाळा.
लाकूड, कोळसा आणि कचरा जाळू नये. वीज, गॅस अशी स्वच्छ इंधनं वापरा. फटाके फोडणं टाळा.
सिगारेट, बिडीसारख्या तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळा.
डासांच्या कॉईल आणि अगरबत्ती जाळणं टाळावं.
दम लागणं, चक्कर येणं, खोकला, छातीत दुखणं अशी लक्षणं असतील त्यांनी त्वरीत वैद्यकीय मदत घ्यावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.