एअर इंडियाचे कर्मचारी होणार बेघर ?

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कलिना मधील निवासस्थान सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे.
एअर इंडियाचे कर्मचारी होणार बेघर ?
एअर इंडियाचे कर्मचारी होणार बेघर ?सुमित सावंत
Published On

सुमित सावंत

मुंबई: एअर इंडियाच्या Air India कर्मचाऱ्यांना कलिना मधील निवासस्थान सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. 6 महिन्यात ही घरं कर्मचाऱ्यांना खाली करावी लागणार आहेत. पण याविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हे देखील पहा-

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतल्या कलिना भागात कर्मचारी वसाहत उभारली होती. या वसाहतीत 1600 घरं आहेत. पण एअर इंडिया ही कंपनी टाटांनी विकत घेतल्या नंतर या कर्मचाऱ्यांना एअर इंडियाची घरं सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. येत्या 6 महिन्यात ही घरं खाली करण्याची नोटीस या कर्मचाऱ्याना देण्यात आली आहे. 5 ऑक्टोंबरला एअरलाईन्स कडून ही नोटीस कर्मचऱ्याना देण्यात आली आहे. या नोटीसवर 6 महिन्यात घर खाली करत असल्याचं या कर्मचाऱ्यांना 20 ऑक्टोबर पर्यंत एरअलाईन्सला कळवाव लागणार आहे .

एअर इंडियाचे कर्मचारी होणार बेघर ?
परमबीर वसुली प्रकरणात दाऊदच्या साथीदार वाँटेड

पण या नोटिशीनंतर वसाहतीतील एरलाईन्स कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा हवाई वाहतूक महाव्यवस्थापकांना पत्र देऊन दिला आहे. या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, 'ज्या ऐरलाईन्सच्या कर्मचाऱ्याना घर भाडा भत्ता दिला जात नाही आणि त्यांची मुंबईत घरं नाही आहेत त्यांना सेवा नियमानुसार हे कर्मचारी सेवेत असेपर्यंत निवासस्थान मिळण्यास कायदेशीररित्या पात्र आहेत. त्यामुळे त्यांना बेघर करणं म्हणजे त्यांच्या सेवाशर्थीचा भंग करण्यासारखं आहे' . त्यामुळे येत्या 2 नोव्हेंम्बर पासून कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत .

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com