Mumbai: आरे कारशेड विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Agitation Against Aarey Car Shed: या निर्णयाला पर्यावरणप्रेमी संघटनांसोबतच शिंदे गट आणि भाजप सोडून इतर सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे.
Agitation Against Aarey Car Shed
Agitation Against Aarey Car Shedसंजय गडदे

संजय गडदे, मुंबई

मुंबई: मेट्रो तीनच्या आरे कारशेड (Aarey Car Shed) विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आक्रमक झाला आहे. आज, रविवारी आरे जंगलातील पिकनिक पॉईंट येथे मेट्रोच्या कारशेडविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन (Agitation) करण्यात आले. यावेळी भाकप (कम्युनिस्ट) चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांकडून आरे कारशेड विरोधात आणि शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. (Agitation Against Aarey Car Shed)

Agitation Against Aarey Car Shed
Amravati: फडणवीस काय स्पायडरमॅनसारखे काम करणार का? जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीप्रकरणी नाना पटोलेंची खरमरीत टीका

राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मेट्रो तीनसाठीचे कांजूरमार्ग येथील कारशेड रद्द करून ते पुन्हा आरे येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाला पर्यावरणप्रेमी संघटनांसोबतच शिंदे गट आणि भाजप सोडून इतर सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. सत्तांतर झाल्यापासून प्रत्येक रविवारी आरे येथे पर्यावरण प्रेमींसोबतच विविध राजकीय पक्ष आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com