सिद्धेश म्हात्रे -
नवी मुंबई : नवी मुंबईतील तब्बल ३० शिवसेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार असून हे ३० नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ (Thane) नवी मुंबईत देखील शिनसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिंदे गटात अनेक आमदार सामील झाले आहेत. शिवाय अजून काही खासदार आमच्या संपर्कात असून ते देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेत (Shivsena) पडलेली मोठी फूट आणि भाजपने शिंदे यांना दिलेलं मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.
अशातच आता नवी मुंबईतील (Navi Mumbai) जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत असून हे नगरसेवक आज रात्री मुंबईत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. या नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण 30 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला पडणार खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे.
ठाण्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात -
ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हे ६६ नगररसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत या नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता सत्ताकेंद्र बदलल्यामुळे आणि शिंदे गटाची ताकद वाढल्यामुळे शिवसेनेतील होणारी नगरसेवकांची गळती ही उद्धव ठाकरेंसाठी मोठी डोकेदु:खी ठरत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.