Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

Nitin Gadkari: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टवतीने पुरस्कार यंदाचा पुरस्कार कुणाला देणार त्यांचे नाव जाहीर केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव या पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आले आहे.
Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर
Nitin GadkariSaam Tv
Published On

पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी या नावाची घोषणा केली आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी पुण्यात १ ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टवतीने पुरस्कार दिला जातो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला १ ऑगस्ट १९८३ पासून करण्यात आली. १ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. १९८३ पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो.

Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर
Nitin Gadkari: "शिवाजी महाराज १०० टक्के सेक्युलर, त्यांनी अफझल खानाची कबर.." गडकरींचा भाजप नेत्याला घरचा आहेर

लोकमान्य टिळक पुरस्कारचे आतापर्यंतचे मानकरी -

गोदावरी परुळेकर

इंदिरा गांधी (मरणोत्तर)

श्रीपाद अमृत डांगे

अच्युतराव पटवर्धन

खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर)

सुधाताई जोशी

मधु लिमये

बाळासाहेब देवरस

पांडुरंगशास्त्री आठवले

शंकर दयाळ शर्मा

अटलबिहारी वाजपेयी

टी. एन. शेषन

डॉ. रा. ना. दांडेकर

डॉ. मनमोहन सिंग

डॉ. आर. चिदम्बरम

डॉ. विजय भटकर

राहुल बजाज

प्रा. एम. एस. स्वामिनाथन

डॉ. वर्गीस कुरियन

रामोजी राव

एन. आर. नारायण मूर्ती

सॅम पित्रोदा

जी. माधवन नायर

डॉ. ए. सिवाथानू पिल्लई

मॉन्टेकसिंग अहलुवालिया

प्रणब मुखर्जी

शीला दीक्षित

डॉ. कोटा हरिनारायण

डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे

डॉ. ई. श्रीधरन

डॉ. अविनाश चंदेर

सुबय्या अरुणन

शरद पवार

आचार्य बाळकृष्ण

डॉ. के. सिवन

बाबा कल्याणी

सोनम वांगचूक

डॉ. सायरस पूनावाला

डॉ. टेस्सी थॉमस

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुधा मूर्ती

Lokmanya Tilak Award: PM मोदींनंतर नितीन गडकरींचाही पुण्यात सन्मान, लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर
Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com