पेट्रोलनंतर सीएनजी आणि गॅसही महागला; जाणून घ्या दर !

आजकाल अनेक वाहनांमध्येही सीएनजी बसवण्यात येतो. पण आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आजपासून वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोलनंतर सीएनजी आणि गॅसही महागला; जाणून घ्या दर !
पेट्रोलनंतर सीएनजी आणि गॅसही महागला; जाणून घ्या दर !Saam Tv

मुंबई : आजकाल अनेक वाहनांमध्येही सीएनजी CNG बसवण्यात येतो. पण आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे, पेट्रोल Pertol आणि डिझेल Disel दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पीएनजी PNG गॅसच्या किमतीतही आजपासून वाढ करण्यात आली आहे. After petrol, CNG and piped gas also became more expensive

महानगर गॅस लिमिटेड Mahanagar Gas Limited या इंधन पुरवठादार कंपनीने, मंगळवार मध्यरात्रीपासून मुंबईत प्रती किलो 2 रुपये 58 पैशांची वाढ सीएनजीच्या किमतीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता सामान्य जनतेला आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे आणखीनच या सिलेंडरच्या Cylinder किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे.

हे देखील पहा-

महानगर गॅसकडून सांगण्यात आले आहे की, वाहतूक आणि अन्य खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ लागू करण्यात आली. त्यामुळे आता वाहनांच्या सीएनजीवर CNG चालणाऱ्या भाड्यातही वाढ Hike होऊ शकते. रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना या दरवाढीने मोठा फटका बसणार. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली असल्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. पाईप गॅसच्या दरात 55 पैसे प्रती युनिट वाढ करण्यात येणार आहे.

पेट्रोलनंतर सीएनजी आणि गॅसही महागला; जाणून घ्या दर !
पाऊस पडताच मलंगगड परिसरात पुन्हा पर्यटकांची गर्दी...

सीएनजी आणि पाईप गॅसचे दर ?

एक किलोसाठी ५१.९८ रुपये इतका सीएनजीचा भाव वाढणार आहे.

ग्राहकांसाठी पाईप गॅससाठी Pipe Gas प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार स्लॅब-१ साठी ३०.४० रुपये प्रती युनिट. आणि स्लॅब-३ साठी ३६ रुपये प्रती युनिट दर असेल, असे कंपनीने Company सांगितलेले आहे.

तर सिलेंडरची किंमत व्यावसायिक वापरासाठीच्या 84 रुपयांनी वाढली होती.

एमजीएलचा MGL सीएनजी दर ४९.४० रुपये होता. यामध्ये २.५८ रुपये प्रति किलोची मोठी वाढ झाली आहे. यामुळे मंगळवार म्हणजेच १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर ५१.९८ रुपये प्रति किलो झाला आहे.

तब्बल ५ रुपये प्रति स्लॅब पीएनजीच्या PNG दर मध्येही वाढ करण्यात आली आहे. पीएनजीच्या पहिल्या स्लॅबचा दर सध्याच्या २५.४६ रुपये होता. परंतु आता प्रति एससीएम यावरून ३०.४० रुपये करण्यात आला आहे. तर ३०.४० रुपयांवरून ३६ रुपये प्रति एससीएम दुसऱ्या स्लॅबचा Second swab दर करण्यात आला आहे.

एमजीएलने दावा केला आहे कि, वायू वाहतुकीच्या खर्चामध्ये transportation costs वाढ झाल्याने परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च वाढल्याने ही दरवाढ करावी लागली. या दरवाढ झाल्यानंतरही सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे ६७ व ४७ टक्के स्वस्त असणार आहे. तसेच एमजीएलचे MGL म्हणणे आहे, घरगुती एलपीजीपेक्षा LPG पीएनजी ३५ टक्के स्वस्त असेल.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com