Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्यानंतर आणखी 6 IAS अधिकाऱ्यांवर टांगती तलवार, वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार तपासणी

Puja Khedkar Row: पूजा खेडकर यांच्यानंतर कार्मिक विभागाने प्रशिक्षणार्थी आणि सेवारत अधिकाऱ्यांसह इतर सहा अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
पूजा खेडकर यांच्यानंतर आणखी 6 IAS अधिकाऱ्यांवर टांगती तलवार, वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार तपासणी
Pooja KhedkarSaam Tv
Published On

वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वादानंतर अनेक आयएएस अधिकाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच आता सहा आयएएस अधिकाऱ्यांवर टांगती तलवार आहे. डिया टुडेच्या वृत्तानुसार, कार्मिक विभागाने प्रशिक्षणार्थी आणि सेवारत अधिकाऱ्यांसह इतर सहा अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, माजी आयएएस पूजा खेडकर यांनी निवडीसाठी खोटे अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणपत्रे सादर केल्याच्या वादानंतर ही घटना घडली आहे. सहा अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तपासले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पूजा खेडकर यांच्यानंतर आणखी 6 IAS अधिकाऱ्यांवर टांगती तलवार, वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार तपासणी
Manorama Khedkar Bail: मोठी बातमी! माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा यांना जामीन मंजूर

या सहा अधिकाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अशातच कार्मिक व प्रशिक्षण विभागाने आरोग्य सेवा महासंचालकांना पत्र लिहून वैद्यकीय मंडळाकडून उमेदवारांच्या अपंगत्वाची स्थिती पुन्हा तपासण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाने माजी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर त्यांची नियुक्ती रद्द केली आहे. यूपीएससीने त्याची उमेदवारीच रद्द केली नाही, तर त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यावर बंदी टाकली आहे.

पूजा खेडकर यांच्यानंतर आणखी 6 IAS अधिकाऱ्यांवर टांगती तलवार, वैद्यकीय प्रमाणपत्रांची होणार तपासणी
Gunratna Sadavarte On Supreme Court : SC, ST आरक्षणाबाबतचा निकाल चुकीचाच ; गुणरत्न सदावर्तेंचं सुप्रीम कोर्टाच्या निकालालाच आव्हान

यूपीएसपीने सांगितलं आहे की, पूजा खेडकर यांनी त्यांचे नावच नाही तर त्यांच्या पालकांचेही नाव बदलले. तसेच, फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून बनावट ओळख निर्माण करून, परीक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न करून फसवणूक केली. यूपीएससीने म्हटले आहे की, सर्व नोंदी तपासल्यानंतर पूजा खेडकर यांनी CSE-2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com