१९ महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून मुंबई-पुणेकरांच्या सेवेत दाखल...

सुमारे १९ महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून मुंबई-पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
१९ महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून मुंबई-पुणेकरांच्या सेवेत दाखल...
१९ महिने बंद असलेली सिंहगड एक्सप्रेस आजपासून मुंबई-पुणेकरांच्या सेवेत दाखल...Saam Tv News
Published On

पुणे: मुंबई-पुणे मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती. ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला हार घालून स्वागत केलं. आजपासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. (After 19 months, Sinhagad Express re-entered the service of Mumbai-Punekar from today)

हे देखील पहा -

पुण्यावरून ही रेल्वेगाडी (क्र. ०१००९) सकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी निघाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी (क्र. ०१०१०) सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी निघेल आणि रात्री १० वाजता पुण्यात पोहोचेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. पुणे व मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे. यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com