
Mumbai News : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १७ रुग्णांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली होती. मात्र रुग्णसंख्येच्या तुलनेत डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असणे, हे एक कारण या घटनेला असल्याचं निदर्शनास आलं होतं. राज्यभरातील अनेक रुग्णालयांची स्थिती अशीच आहे. सरकारी रुग्णालयांची हीच अडचण दूर करण्यासाठी सरकारने वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाची नोकर भरती अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ११ हजार जागांसाठी जाहिरात निघणार आहे. ठाण्यात रुग्णांच्या मृत्यू प्रकरणानंतर सरकारला जाग येऊन भरती प्रक्रियेला वेग आला आहे. (Maharashtra News)
आरोग्य विभागात 'क' आणि 'ड' श्रेणीतील ११,९०३ जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघण्याची शक्यता आहे. रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जातात.
गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश आहे. तर 'गट ड' संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे. (Latest Marathi News)
सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.