आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील 'पेंग्विन' पुन्हा एकदा वादात, होतोय कोट्यवधी खर्च!

मुंबई महापालिकेच्या भायखळ्यातील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान(राणीच्या बागेतील) पेंग्विनवरचा खर्च कोट्यवधी रुपये असल्याचे समोर आले असून, ३ वर्षांसाठी पेंग्विनच्या देखभालीकरता १५ कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. पेंग्वीन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी - काँग्रेस
आदित्य ठाकरेंचे 'पेंग्विन' पुन्हा एकदा वादात, होतोय कोट्यवधी खर्च!
आदित्य ठाकरेंचे 'पेंग्विन' पुन्हा एकदा वादात, होतोय कोट्यवधी खर्च!File Photo

मुंबई : पर्यावरणमंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून, मुंबई महानगरपालिकेने जुलै २०१६ मध्ये दक्षिण कोरियाच्या सेऊलमधून तीन नर आणि पाच मादी जातीचे आठ हम्बोल्ट पेंग्विन आणले होते. त्यातील एका पेंग्विनचा श्वसनाच्या त्रासाने ऑक्टोबर २०१६ मध्येच मृत्यू झाला होता. उर्वरित ७ पेंग्विन सध्या मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातील वीर माता जिजाबाई भोसले उद्यान (राणीच्या बागेत) अद्ययावत सुविधा असलेल्या क्वारंटाईन क्षेत्रात ठेवण्यात आलेले आहेत.

या हायफाय विदेशी पाहुण्यांचा वर्षाकाठीचा खर्च ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल, आदित्य ठाकरेंची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन सध्या त्यांच्यावर होणाऱ्या अवाढव्य खर्चाने पुन्हा एकदा वादात आले आहेत. आदित्य ठाकरेंची संकल्पना असलेल्या पेंग्विनवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. ३ वर्षांच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी तब्बल १५ कोटींचे टेंडर महापालिकेने काढले असून राणी बागेतील हे पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचा घणाघाती आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. यापूर्वीही गेल्या ३ वर्षांसाठी तब्बल ११ कोटींचं टेंडर काढले होते.

पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरजच काय आहे असा सवाल महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. यापूर्वीही मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्यावरुन आणि त्यांच्या खर्चावरुन या प्रकल्पाला विरोध झाला होता. एकीकडे कोरोना, लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतांना पेंग्विनच्या लिशान लाईफस्टाईलवर एवढा खर्च कशासाठी हा सवाल विरोधकांनी केला आहे.

राणीच्या बागेतल्या पेंग्विन्सच्या आलिशान लाईफस्टाईलचा खर्च :

एका दिवसाचा एका पेंग्विनवरचा खर्च : २० हजार

एका दिवसाचा ७ पेंग्विनवरचा मिळून खर्च : दिड लाख

एका महिन्याचा एका पेंग्विनसाठी खर्च : ६ लाख

एका महिन्याचा ७ पेंग्विनचा खर्च : 42 लाख

एका वर्षाचा एका पेंग्विनसाठीचा खर्च : 71लाख

एका वर्षाचा ७ पेंग्विनवरचा खर्च : 5 कोटी

एकूण ३ वर्षांसाठी ७ पेंग्विनचा खर्च : १५ कोटी

आदित्य ठाकरेंचे 'पेंग्विन' पुन्हा एकदा वादात, होतोय कोट्यवधी खर्च!
Crime : नागपूर शहरात गुंडांचा हैदोस; हातात शस्त्रे घेऊन माजवली दहशत!

पेंग्विनखरेदीसाठी आणि कक्षासाठी एकूण २५ कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर ३ वर्षाच्या देखभालीसाठी ११ कोटी खर्च झाले. आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी खर्च अपेक्षीत आहे. निवीदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल. २०१६ साली दक्षिण कोरियातून आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनसाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे.

पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्किय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य, विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लीमेंटस् दिल्या जातात. गेल्या तीन वर्षात एक नवजात पिल्लु पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यु झाला आहे.

भायखळा राणी बागेतील पेंग्विनच्या देखभाली पालिकेची सुधारीत निविदा काय आहे?

पुढील 3 वर्षांसाठी पालिका 15 कोटी रुपये एकूण 7 पेंग्विन वर खर्च करणार आहे. त्यामुळे महापालिकेने 15 कोटींची सुधारित निविदा काढली असून प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 2018 मध्ये तीन वर्षाचा देखभालीचा करार हा 11 कोटींचा करण्यात आला होता, तो आता संपत आहे. त्यामुळे याचसाठी केला होता का अट्टाहास? असा सवाल सर्वसामान्य देखील उपस्थित करू लागले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com