आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.
आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी
आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणीSaam Tv
Published On

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आरोग्य भरती घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक झालेले दिसून आले होते. आज परत एकदा टीईटी (TET), म्हाडा (MHADA), आरोग्य विभागाच्या भरती घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. याचबरोबर अतिवृष्टीचा कोकण (Konkan) आणि विदर्भाला चांगलच फटका बसला होता.

मात्र, आजून देखील शेतकऱ्यांना (farmers) मदत मिळाली नाही. यावरून देखील विरोधक सरकारला (government) घेरण्याची चिन्हे आहेत. आदित्य ठाकरेंना धमकी (Threat) येते, हे गंभीर आहे. पण सुनिल प्रभूंनी भाजप (BJP) बरोबर जोडण्याचा प्रयत्न केला आहे. गौरी लंकेश यांची हत्या कर्नाटकामध्ये (Karnataka), तर २ हत्या महाराष्ट्रात (Maharashtra) झाले आहेत. प्रत्येक प्रकरणाला राजकीय रंग देऊन फायदा नाही.

हे देखील पहा-

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जे सांगितले आहे, अध्यक्ष महोदय ट्रेंडिंग (Trending) झाले होते, त्याची चौकशी करा. रझा अकादमीची चौकशी करा. सनातनचं सांगत आहेत. २ वर्षांपासून तुमचे सरकार आहे. तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही कारवाई का केली नाही असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) आलेली धमकी गंभीर आहे. त्याची उच्च स्तरीय चौकशी करा आणि याप्रकरणी कारवाई करावी अशी देखील मागणी फडणवीस यांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी; फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी
धक्कादायक! तामिळनाडूत एकाचवेळी आढळले 33 नवीन ओमिक्रॉन रुग्ण

निलोफर उत्पलला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) ट्रेंड करण्याकरिता ३ लाख रुपये देण्यात आले होते. तिकडच्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) देण्यास सांगितले, अद्याप यामधून काहीच निष्पन्न झाले नाही. याचे धागेदोरे कर्नाटकामध्ये आहेत. ट्विटरवरून (Twitter) मला देखील धमक्या येत आहेत. गृहमंत्र्यांना याची कल्पना दिली आहे, सनातनसारख्या संस्था या दाभोळकर, कलबुर्गी यांच्या हत्येमागे आहेत.

गोव्यामध्ये (Goa) भाजपकडून पाठराखण केली जात आहे. आयपीएस (IPS) अधिकार्याच्या माध्यमातून एसआयटी (SIT) नेमायला हवी. आमच्या सरकारला बदनाम करण्याचे कट कारस्थान होत आहेत. कर्नाटक, कलबुर्गी, लंकेश हत्या यांचे कनेक्शन आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीशी असल्याचे नवाब मलिक हे विधानसभेत यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com