३३ देशांनी बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र, मुंबई पुढे जात होती हे विरोधकांना बघवले नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Eknath shinde and aditya thackeray
Eknath shinde and aditya thackeray saam tv
Published On

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. आज मुंबईतील माहिम येथे आदित्य ठाकरे यांनी भेट दिली, यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली. ३३ देशांनी यांच्या बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी गद्दारांवर तोफ डागली.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माहीम कोळीवाडा येथील शाखा क्रमांक १८२ ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले. दरम्यान, शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन केले.

Eknath shinde and aditya thackeray
भारताने वेस्ट इंडिजचा ५९ धावांनी केला पराभव; मालिकाही घातली खिशात

यावेळी आदित्य ठाकरे यांनी फटक्यांवरून बंडखोर आमदारांवर टीका केली. ५० चा बार आहे तो आधीच फुटला आहे. जे फुटायचे होते ते फुटले, आता कुणी नाही फुटणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. माहीमने वाढवले, मोठे केले ते फुटले. त्याबद्दल वाईट वाटत आहे. ज्यांना जायचे होते ते गेले, आता नवीन लोकांना संधी देणार. गरजेपेक्षा जास्त दिले त्याचे अपचन झाले म्हणून हाजमोला खाण्यासाठी ते तिकडे गेले, अशी टीकाही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली.

महाराष्ट्रात चांगलं सुरू होतं, हे बघवलं नाही म्हणून फुटले. उद्धव साहेबांसारख्या चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. कोरोना काळात चांगलं काम केलं. जातीय वाद झाले नाहीत,महाराष्ट्र पुढे जात होता. तेव्हा विरोधकांना महाराष्ट्र पुढे जात आहे त्याला अडवायला सुरुवात केली, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Eknath shinde and aditya thackeray
Jagdish Dhankhar|जगदीप धनखर देशाचे नवे उपराष्ट्रपती; जाणून घ्या त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

राज्यपाल यांनी महात्मा फुलेंविषयी वक्तव्य केलं होतं. नुकतंच त्यांनी मुंबई ठाणे बद्दल वक्तव्य केलं. मी बरेच राज्यपाल पाहिले पण असे राज्यपाल पाहिले नाही. पी अलेक्झांडर पासून आतपर्यंत राज्यपाल झाले, पण असे राज्यपाल बघितले नाहीत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

राज्यातील बेकायदेशीर हे सरकार आहे. जम्बो मंत्रिमंडळ आहे. पण काही निर्णय घ्यायचा असेल दिल्लीवारी करतात. हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. नेमका मुख्यमंत्री कोण आहे? माईक काय काढून घेतात, चिठ्ठी काय देतातहे आधी कधी झालं नव्हतं. हे सरकारच बेकायदेशीर आहे आणि हे सरकार पडणार म्हणजे पडणारच, असा विश्वासही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com