युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता...; आदित्य ठाकरेंचे आवाहन

जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”
Aditya Thackeray
Aditya Thackeray Saam Tv

मुंबई - महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले. सत्तासंघर्षाच्या काळात अनेक राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आला. मागील आठवडाभरात राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Rain) झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

हे देखील पाहा -

अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळं अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहे त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. भूस्खलन तसेच वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विट करत शिवसैनिकांना (Shiv Sena) पूरस्थितीबाबत आवाहन केलं आहे.

आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.

Aditya Thackeray
खाद्यान्नवर GST लागू करू नये; कोपरगाव व्यापारी महासंघाची मागणी

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विमध्ये म्हटले आहे की, युवासैनिकांनो! आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा… सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे… जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची “हीच ती वेळ”. असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com