खाद्यान्नवर GST लागू करू नये; कोपरगाव व्यापारी महासंघाची मागणी

निर्णय मागे न घेतल्यास जीवनावश्यक वस्तूंसह सर्व व्यापार बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही व्यापारी महासंघाने दिला आहे.
GST collection
GST collection Saam Tv

मोबीन खान

अहमदनगर - काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काही वस्तुंवरील जीएसटीमध्ये बदल केला आहे. जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा जीएसटी १८ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. यात काही रोजच्या दैनंदिन वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे सोमवारपासून आपल्या खिशाला कात्री लागणार आहे. घरगुती वस्तू, हॉटेल आणि बँक सेवांसह इतर काही गोष्टींसाठी जास्त खर्च करावे लागणार आहेत. चंदीगड येथे झालेल्या जीएसटी (GST) कौन्सिलच्या ४७ व्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने (Central Government) अन्नधान्य व खाद्यान्न यावर जीएसटी लावण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशभरात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा निर्णय व्यापाऱ्यांसह प्रत्येक नागरिकांवर अन्याय करणारा असल्याने सरसकट सर्व अन्नधान्य व खाद्यान्नवर जीएसटी लागू केल्यास महागाई वाढणे, तसेच व्यापाऱ्यांना व्यापार करणे अतिशय त्रासदायक होणार आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत रद्द करावा अश्या मागणीचे निवेदन आज कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले असून याची प्रत तहसिल कार्यालय येथे देण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

या निर्णयाच्या निषेधार्थ आज देशभरातील व्यापार बंद ठेवण्यात आला असून हा निर्णय मागे न घेतल्यास जीवनावश्यक वस्तूंसह सर्व व्यापार बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही व्यापारी महासंघाने दिला आहे.

या वस्तूंच्या वाढणार किंमती

१) छपाई, लेखनाची शाई - १८%,

२)कटिंग ब्लेड, चाकू, पेपर चाकू, पेन्सिल शार्पनर आणि ब्लेड, चमचे, काटे, लाडू, स्किमर्स, केक-सर्व्हर -१८%,

३) विजेवर चालणारे पंप , खोल ट्यूबवेल टर्बाइन पंप, सबमर्सिबल पंप, सायकल पंप -१८%,

४) धान्य करण्याचे यंत्र, दळण उद्योग किंवा धान्य प्रक्रियेसाठी यंत्रसामग्री, पवनचक्क्या, पिठाच्या गिरण्या-१८%,

५) अंडी, फळे किंवा इतर कृषी उत्पादने आणि त्यांची साफसफाई करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे, मिल्किंग मशीन आणि डेअरी मशिनरी -१८%.

६) एलईडी दिवे, दिवे आणि फिक्स्चर, त्यांचे मेटल सर्किट बोर्ड -१८%

७) शिक्के- १८%

GST collection
मोठी बातमी! औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

८) सोलर वॉटर हीटर्स आणि सिस्टम -१२%

९) तयार लेदर / कॅमोइस लेदर - १२%

१०) नकाशे आणि इतर हायड्रोग्राफिक तक्ते, अॅटलसेस, भिंतीचे नकाशे, स्थलाकृतिक योजना आणि ग्लोब, छापलेले नकाशे - १२%

११) १,००० रुपयांपर्यंतचा हॉटेल मुक्कामवर - १२%,

१२) ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रूग्णालयाची खोलीच्या भाड्यावर ५% वाढवण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com