शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अदर पुनावाला यांची मोठी भेट

परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी मोठी घोषणा केली आहे.
शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अदर पुनावाला यांची मोठी भेट
शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अदर पुनावाला यांची मोठी भेटtwitter/@adarpoonawalla
Published On

परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे अशा विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. (adar poonawalla is doing financial help of students who going for study out of india)

भारतात कोव्हिशील्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी शिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हे देखील पहा -

भारताबाहेरील अनेक देशांमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. हा क्वारंटाईन कालावधी पुर्ण केल्यानंतरच त्यांना देशात इतर ठिकाणी फिरण्याची मुभा मिळते. त्यामुळे हा क्वारंटाईन कालावधी पुर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासू शकते, त्यासाठीच या पॅकेजची घोषणा करण्यात आल्याचं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. परदेशात शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अदर पुनावाला यांनी केलं आहे.

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अदर पुनावाला यांची मोठी भेट
Tokyo Olympics: कुस्तीमध्ये रवीला रौप्य तर दिपक पुनिया चितपट

परदेशात एंबर लिस्टमधील देशांतील प्रवाशांना त्यांच्या घरी किंवा त्यांच्या इतर इच्छीत ठिकाणी क्वारंटाइन राहता येत होते. मात्र असे असले तरी तेथे जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना आता १० दिवसांसाठी क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे. यात भारताला ८ ऑगस्टपासून एंबर लिस्टमध्ये सामील केले जाणार आहे, त्यामुळे अदर पुनावाला यांनी घोषित केलेल्या पॅकेजचा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com