मुंबई विमानतळ: 'अदानी एअरपोर्ट' बोर्ड पाहून शिवसैनिकांचा राडा
मुंबई विमानतळ: 'अदानी एअरपोर्ट' बोर्ड पाहून शिवसैनिकांचा राडाSaam Tv

मुंबई विमानतळ: 'अदानी एअरपोर्ट' बोर्ड पाहून शिवसैनिकांचा राडा

आज दुपारी मुंबई विमानतळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या 'अदानी एअरपोर्ट' नावाचा फलक शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्याकडून फोडण्यात आला.
Published on

मुंबई : आज दुपारी मुंबई विमानतळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या 'अदानी एअरपोर्ट' नावाचा फलक शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्याकडून फोडण्यात आला. मुंबई विमानतळाला 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे नाव आहे. शिवसेना कार्यकर्ते यांचे म्हणणे होते की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 'अदानी एअरपोर्ट' नावाचा फलक कसा काय लावण्यात आला? असा प्रश्न विचारत शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी हा फलक फोडून आंदोलन केले.

मागील महिन्यात १३ जुलैला मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे आला. त्यानंतर 'अदानी एअरपोर्ट' चे नाव विमानतळावर ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. याआधी तेथे जीव्हीके कंपनीचे नावाचे फलक होते. आता तिथे आता 'अदानी एअरपोर्ट' नावाचे फलक झळकत आहेत. त्यावरच शिवसेनेने आक्षेप घेतला आणि मुंबई विमानतळावर अशा प्रकारचे फलक लावण्यात येऊ नये. मुंबई विमानतळाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ'च राहणार आहे आणि हे नाव बदलण्याचा कोणताही प्रयत्न करू नये असे सांगण्यात आले.

शिवसेना कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी अदानी एअरपोर्ट नावाचे फलक फोडले त्याठिकाणी आधी जीव्हीके कंपनीच्या लोगोसह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे नाव होते. मात्र, ताबा अदानी समूहाकडे येताच फक्त 'अदानी एअरपोर्ट' हे नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आले. या कृतीमुळे शिवसैनिक आक्रमक झाले.

मुंबई विमानतळ: 'अदानी एअरपोर्ट' बोर्ड पाहून शिवसैनिकांचा राडा
महिला हॉकी संघाच्या कामगिरीवर शाहरुख खान खुश! खऱ्या कबीर खानला म्हणाला...

काय म्हणाले होते अदानी -
गौतम अदानी यांनी मुंबई विमानतळाचे टेकओव्हर पूर्ण झाल्यानंतर एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले होते, आम्हाला आनंद आहे जागतिक दर्जाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचे टेकओव्हर केले. आमचे वचन आहे, आम्ही मुंबईचा गौरव वाटावे असे काम करू. अदानी समूह व्यवसाय लक्झरी आणि मनोरंजनासाठी भविष्यातील विमानतळांचे इकोसिस्टिम उभे करेल.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com