Mumbai News : स्वप्न भंगल, पैसेही गेले! रजनीकांत यांच्या नावाने अभिनेत्रीची लाखो रुपयांची फसवणूक, दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल

अंधेरी येथील नवोदित अभिनेत्रीची तब्बल साडेआठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
Mumbai News : स्वप्न भंगल, पैसेही गेले! रजनीकांत यांच्या नावाने अभिनेत्रीची लाखो रुपयांची फसवणूक, दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल

>> संजय गडदे

मुंबई : सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाने एका अभिनेत्रीची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंबईत समोर आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. (Mumbai News)

आगामी जेलर आणि पुष्पा दोन या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका देण्याचे बतावणी करून अंधेरी येथील नवोदित अभिनेत्रीची तब्बल साडेआठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अभिनेत्रीच्या आईने वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पियुष जैन आणि समीर अशी या दोघांची नावे आहेत.

Mumbai News : स्वप्न भंगल, पैसेही गेले! रजनीकांत यांच्या नावाने अभिनेत्रीची लाखो रुपयांची फसवणूक, दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल
Mumbai News : धारावी हादरली! पत्नीसमोरच पतीची सपासप वार करुन हत्या, पत्नीही जखमी

इंस्टाग्राम या सोशल मीडियावर आरोपी आणि पीडिता यांची ओळख झाली होती. यानंतर आरोपींनी पीडितेच्या इंस्टाग्रामवर एक फ्रेश चेहरा आगामी चित्रपटासाठी शोधत आहोत असा मेसेज पाठवला. पीडितेने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी एक फोटो व्हॉट्सअॅपवर मागून घेतला. त्यानंतर आरोपींनी रजनीकांत आणि पीडितेचे चित्रपटाचे एक पोस्टर तयार करून पीडितेला व्हॉट्सअॅपवर पाठवले.

रजनीकांच यांच्या आगामी चित्रपटात आपण तुम्हाला संधी देऊन असी थाप आरोपींनी पीडितेला मारली. दोन्ही आरोपींना पीडितेला विश्वासात घेतलं. त्यानंतर पियुष नावाच्या व्यक्तीने पासपोर्ट आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या शूटिंगसाठी विजा गरजेचा असल्याने त्यासाठी साडेआठ लाख रुपये ऑनलाईन मागवून घेतले. मागणीप्रणाणे पीडितेने पैसे देखील दिले.

Mumbai News : स्वप्न भंगल, पैसेही गेले! रजनीकांत यांच्या नावाने अभिनेत्रीची लाखो रुपयांची फसवणूक, दोन आरोपींविरोधात तक्रार दाखल
Mumbai News : 'मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी'; मोदींच्या मुंबई दौऱ्याची 'सामना'त पानभरुन जाहिरात

मात्र त्यानंतर ना विजा आला ना चित्रपटाच्या शूटिंगसाठी फ्रान्सला नेण्यात आलं. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात या नवोदित अभिनेत्रीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन या दोघांविरोधात तक्रार दिली आहे. सध्या दोन्हीही आरोपी फरार असून वर्सोवा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com