Kalyan News : कल्याण महावितरणची धडाकेबाज कारवाई, दीड कोटीची वीजचोरी उघडकीस

यापुढेही विशेष पथकांच्या कारवाया नियमितपणे सुरू राहणार आहेत.
Kalyan Mahavitran, Mahavitran
Kalyan Mahavitran, Mahavitransaam tv

- अभिजीत देशमुख

Mahavitran News : महावितरणच्या कल्याण मंडळ कार्यालयाअंतर्गत (mahavitran kalyan) उच्चदाब थ्री फेज ग्राहकांची वीज चोरी रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकाने गेल्या दोन महिन्यात तब्बत १ कोटी ४३ लाख रुपयांच्या ३८ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यातील २९ उच्चदाब ग्राहकांकडून वीजचोरीच्या देयकांचे १ कोटी १७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोंघाविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत. (Maharashtra News)

Kalyan Mahavitran, Mahavitran
Maratha Kranti Morcha आक्रमक, पंढरपूरात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; 'आरक्षण दिले तरच मुख्यमंत्र्यांना यंदाची आषाढीची महापूजा करू देणार'

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून परिमंडलातील कल्याण एक, कल्याण दोन, वसई आणि पालघर या चारही मंडल कार्यालयांतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या तपासणीसाठी नियमित कर्मचाऱ्यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. कल्याण मंडल कार्यालय एकच्या विशेष पथकाने उमेशनगर (umeshnagar) , हाजीमलंग (hajimalang), गौरीपाडा (gauripada), नेतीवली (netvali), खंबालपाडा (khambalpada), सोनारपाडा (sonarpada), सागाव, रेतीबंदर, पारनाका आदी भागात तपासणी केली.

Kalyan Mahavitran, Mahavitran
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : ‘राजाराम’साठी आज सत्ताधारी, विराेधी पॅनेलची बालेकिल्ल्यात सभा; रविवारी मतदान

या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली. तर यातील २९ जणांकडून वीजचोरीच्या देयकाचे १ कोटी १७ लाख रुपये याशिवाय १२ जणांकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यापुढेही विशेष पथकांच्या कारवाया नियमितपणे सुरू राहणार असून कोणतीही युक्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई अटळ असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com