Ambernath: गणेशोत्सवासाठी गावी निघाले अन् वाटेतच कुटुंबाला मृत्यूनं गाठलं; मन हेलावून टाकणारी घटना

गणेशोत्सवासाठी कोकणातील (Kokan) आपल्या मूळगावी जायला निघालेल्या गणेश भक्तांवर काळाने घाला घातला आहे.
Ambernath Accident
Ambernath AccidentSaam TV
Published On

अंबरनाथ: गणेशोत्सवासाठी कोकणातील (Kokan) आपल्या मूळगावी जायला निघालेल्या गणेश भक्तांवर काळाने घाला घातला आहे. अंबरनाथ येथील सावंत कुटुंबीय पोलादपूरजवळ गेले असता त्यांच्या गाडीची आणि शिवशाही बसची धडक झाली या भीषण अपघात सावंत कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या (Ambernath) आनंद पार्क परिसरात जयवंत सावंत हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला होते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg District) असलेल्या त्यांच्या मूळगावी गणेशोत्सवासाठी (Ganeshostav) जाण्यासाठी सावंत कुटुंबीय आज सकाळी रवाना झाले होते. सकाळी ४ च्या सुमारास सावंत कुटुंब अंबरनाथहून रवाना झालं आणि काही तासातच पोलादपूरजवळ त्यांच्या कारची शिवशाही बससोबत धडक झाली.

पाहा व्हिडीओ -

ही धडक एवढी भयानक या अपघातात कारमधील जयवंत सावंत (६०), किरण घागे (२८) या दोघांचा मृत्यू झाला. तर गिरीश सावंत (३४), जयश्री सावंत (५६) आणि अमित भीतळे (३०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना आधी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आलं.

Ambernath Accident
दुर्दैवी! हॉस्पिटलमध्ये जाताना महिला पोलीसासह ९ वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला

तिथे सध्या तिन्ही जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) खराब असल्यानं कोल्हापूरमार्गे जाण्याचा सल्ला सावंत कुटुंबियांना निकटवर्तीयांनी दिला होता, मात्र तिकडून जास्त अंतर पडत असल्यानं सावंत यांनी गोवा महामार्गानेच जाणं पसंत केलं, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com